*सावधान अल्पवयीन मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय* – *सावनेर शहरातील अती वर्दळीच्या स्थानावरुण मुलीला पळवेन नेण्याचा प्रयत्न*

*सावधान अल्पवयीन मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय*


*सावनेर शहरातील अती वर्दळीच्या स्थानावरुण मुलीला पळवेन नेण्याचा प्रयत्न*


*परिवार व परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेने चोरटा जेरबंद*


*पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांचा नागरिकांना सावधतेचे आव्हान*


*अल्पवयीन मुलीला पळविणारा पोलिसांच्या स्वाधीन*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरःसावनेर शहरात सुभाष शाळे मागील रहिवासी अनिल तेजराम कमाले वय (49) याने त्यांची मुलगी वैशाली हिला एका अनोळखी इसमाने पळवून नेण्याच्या प्रयत्न केल्याने त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.* *सविस्तर घटना अशी आहे की शुक्रवारी दुपारी अडीच वाजता दरम्यान वैशाली अनील कमाले वय साडेतीन वर्ष ही घराबाहेर खेळत असताना एका अनोळखी इसमाने तिला उचलून नेत असताना तिच्या आजी जयंतीबाई कमाले हिला दिसला त्यावर तिने माझ्या मुलीला कुठे नेत आहे म्हणून विचारले असता त्याने ही माझीच मुलगी असून मी हिला नेत आहे असे म्हटल्यावर तिने जोरात आरडाओरड केली. तेव्हा मुलीचे वडील अनिल तेजराम कमाले हे दुकानाबाहेर आले मोठ्या संख्येने नागरिक गोळा झाले व त्यांना तो व्यक्ती मुलीला कडेवर घेऊन जाताना दिसला मुलीच्या वडिलांनी नागरिकांच्या मदतीने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले*
*आधी उडवाउडवीचे उत्तरे देणार्या आरोपीला पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला असता त्यांनी आपले नाव अकबर शकील अकबर शेख राहणार पश्चिमबंगल बर्दवान असे सांगितले त्याने आम्ही साड्या विकण्याचे काम करीत असून साड्या विकण्याकरिता फिरत असल्याचे पोलिसांना सांगितले परंतु त्याच्याजवळ एकही साडी नव्हती पोलिसांनी भा द वि 363 511 अन्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास ठाणेदार अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे*

*सतर्क व सावधान रहा पो.नी.सावनेर*

*सावनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांनी आमचे स्थानिक प्रतिनिधीला सदर घटनेची माहीती देत म्हटले की सध्याच्या काळात घरोघरी पोहचून साहित्य विकणार्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.तो व्यवसाईक खरचं व्यवसायी आहे की काय याची खात्री पटवून घेणे थोडे कठीण कार्य जरी असले तर त्यांच्या संशयितहरकती वरुन तो ओळखला जाऊ शकतो.अश्यात आपल्या परिसरात परप्रांतीय अथवा अनओळखी व्यवसायीक आढळून आल्यांस त्यांच्यावर लक्ष ठेवणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.व असे संशयित आपल्या परिसरात दीसताच त्यांची सुचना सावनेर पोलीस स्टेशन व नजिकच्या पोलीस स्टेशन ला देऊण आपण अश्या अप्रिय घटनांनवर आळा आलण्यास सहकार्य करावे अशी विनंती वजा निवेदन पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांनी नागरिकांना केली आहे*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …