*जय जगत 2020 भव्य पदयात्रेचे सावनेर नगरीत मा.सनील केदार मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य स्वागत*

*टाळ मु्दंगाच्या गजरात पदयात्रेचे आगमन*

*जय जगत 2020 भव्य पदयात्रेचे सावनेर नगरीत मा.सनील केदार मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य स्वागत*

*संपूर्ण नगरी झाली गांधीमय*


*ठिक ठिकाणी झाले भव्य स्वागत*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*


सावनेर *राष्ट्रपती महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ राजघाट दिल्ली ते जीनेवा (स्विझरलंड) असा 10151 की.मी.चा प्रवास पदयात्रेद्वारे करण्याचा संकल्प घेऊण जवळपास 50 देश विदेशी गांधी वादींची पदयात्रा दि.12 जानेवारीला मध्यप्रदेश सीमेतून महाराष्ट्र प्रवेश करत सायंकाळी 4-00च्या दरम्यान शिवाजी पुतळा येथ पोहचताच क्षेत्राचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे दुग्ध विकास,पशू संवर्धन,क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते हजारो गांधी प्रेमींच्या प्रमुख उपस्थितीत भव्य स्वागत करूण शीव मंदिर चौक,सिमेंट रोड,होळी चौक,पीलाजी कारोकार चौक,मुरलीधर मंदिर, जमा मश्जीद,मडकी चौक,बाजार चौक,गडकरी चौक,गांधी चौक,राजकमल चौक,बाबासाहेब आंबेडकर पुतला बस स्थानक असे नगर भ्रमन करुण बस स्थानकावरिल काँग्रेस कमेटीच्या कार्यालयात सदर पदयात्रेचे समापन करण्यात आले*

*राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जन्मशताब्दी निमित्त जय जगत 2020 न्याय व शांती की ओर अग्रसर ही जागतिक शांती पदयात्रा राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधी स्थळ राजघाट दिल्ली येथून वरिष्ठ गांधीवादे नेते पी.व्ही.गोपाल व जील कार हँरीस यांच्या नेतृत्वात दि.20 ऑक्टोंबर 2019 ला निघाली असून ती दोन ऑक्टोंबर 2020 ला जिनेवा स्वित्झर्लंड ला पोहोचणार असून तेथे पदयात्रेचे समापन होणार आहे*

*आपल्या सावनेर नगरीत ही पदयात्रा आली असल्याने नगरवासीयांनी यात्रेकरूंचा उत्साह वाढवण्याकरिता व स्वागता करीता आपल्या घरा दारांच्या आंगणात सुरेख रांगोळी काढुन पदयात्रेच्या मार्गावर व यात्रेकरुवर फुलांचा वर्षाव करीत यात्रेत सहभागींचे उत्साहवर्धन केले तर पदयात्रेत सहभागी आ.सुनील केदार मा.मंत्री महोदय सह सर्व पदयांत्रीने शहरातील नगरवासीयांचे श्रध्दास्थान असलले पीलाजी कारोकार स्मु्ती स्थान,गडकरी चौक येथील कै.राम गणेश गडकरी, गांधी चौक येथील गांधी पुतळा,बस स्थानकावरील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पन करण्यात आले*


*जय जगत 2020 न्याय व शांती की ओर अग्रसर या जागतिक पदत्राचे नेतृत्व करणे पी.व्ही.गोपाल व जील कार हँरीस यांनी युवा अवस्थेपासुनच स्वतालाः राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या विचाराशी जोडून घेत काही काळ बापू कुटी सेवाग्राम वर्धा येथे राहून गांधीच्या जीवनीवर सखोल अभ्यास करुण महात्मा गांधींचे सत्य,अहिंसा व शांतीचे विचार देश विदेशात पोहचवीन्या करिता मागील 50 वर्षापासून सतत झठत आहेत पी.व्ही.गोपाल यांनी मध्यप्रदेशातुल चंबल खोर्यातील कुख्यात डाकू दरोडेखोर आदींच्या सहवासात राहुन प्रथम त्याच्या परिवारास व दरोडे खोरांना हिंसा,लुट,मारकाट यामुळे काही सीध्द होणार नाही याऊलट याचा त्यांच्यिवर व त्यांच्या परिविरिवर वाईटच परिणाम होईल हे पटवून सांगत जवळपास 578 कुख्यात डाकुंना आत्मसमर्पनास प्रवु्त करण्याचे भरीव कार्य केले.सोबतच देशातील आदिवासी बांधवांच्या हक्का करिता देशातील जवळपास 20 राज्यात अनेक मोठ्या आदोलनाचे नेतृत्व करित “जल,जंगल,जमीन” या हक्काचे अधिकार आदिवासीयांना मीळवून देण्याकरीता पुढाकार घेत न्याय मीळवून दीला*


*महात्मा गांधी यांच्या 150 व्या जन्मशताब्दी जागतिक पदयात्रेच्या निमित्ताने सावनेर शहरात आलेल्या जवळपास 50पदयात्रीत फ्रांस,स्वित्झरलँड,केनेया,सारख्या अनेक देशाचे पदयाची सहभागी होते हे विशेष*


*पदयात्रेच्या यशस्वीते करीता शहर संयोजक साहेबराव वीरखरे,शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष पवन जैस्वाल,नव नियुक्त जिल्हा परिषद सदस्य माजी गट नेते मनोहर कुंभारे,वरिष्ठ अधिवक्ते श्रीकांत पांडे,ड.भगत,वरिष्ठ समाजसेवी मनोज बसवार,डोमासाव सावजी,नगरसेवक,सुनील चाफेकर,निलेश पटे,दिपक बसवार,माजी नगरसेवक लक्ष्मीकांत दिवटे,दिलावर शेख,गोपाल घटे,श्याम धोटे,रामभाऊ उमाटे,जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल सीरीया,युवक काँग्रेस सावनेर कळमेश्वर तालुका अध्यक्ष राजेश खंगारे,अश्वीन कारोकार,विनीत पाटिल, श्रीजय देशमुख, चंदु कामदार,घनश्याम तुर्के,इमरान शाह,सोनू रावसाहेब,प्रशांत रासेकर,शंकर आगलावे,नाजी़म शेख,साबीर शेख,नितीन नबीरा,पंकज बले,बिल्लू आकोने,संदिप सावल,अजय डाखोळे,भगवंता मोरे,डा पटेल,सज्जोभाई,सह अनेक गणमान्य व हजारोच्या संख्येने नगरवासी प्रमुख्याने उपस्थित होते*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …