तायवाडे महाविद्यालय महादूला-कोराडी येथे राजमाता जीजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
कोराडी– तायवाडे महाविद्यालय महादूला-कोराडी येथे जयंती-पुण्यतिथी समितीतर्फे राजमाता जीजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी अध्यक्षस्थानी जयंती पुण्यतीथी समीतीच्या समन्वयक डॉ.निता धावडे उपस्थित हाेत्या तर प्रमुख अतिथी म्हणून मराठी विभागाचे प्रा. डॉ.राजेन्द्र वाटाणे हे हाेते. याप्रसंगी डॉ वाटाणे यांनी राजमाता जीजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा व्यक्तित्वाचा वेध घेताना त्यांचे कार्य आणि कर्तुत्व आज किती महत्वपूर्ण आहे याची जाणीव करून दिली . शिवाय त्यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे अस्पृश्य निवारणाचे त्यांनी केलेले कार्य देशाची अखंडता कायम ठेवण्यासाठी कसे उपयुक्त ठरणारे आहे याची जाणीव करून दिली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ वकील शेख यांनी तर आभार प्रदर्शन डॉ आनंद भाईक यांनी केले, यावेळी समीतीचे सदस्य डॉ.दिगंबर समर्थ,डॉ. माराेती वाघ,महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज