Breaking News

*मार्कंडादेव येथील शिक्षक परिषदेच्या जिल्हा अधिवेशनात विविध ठराव पारित*

*मार्कंडादेव येथील शिक्षक परिषदेच्या जिल्हा अधिवेशनात विविध ठराव पारित*

गडचिरोली प्रतिनिधी- सूरज कुकुडकर

गडचिरोली: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे २९ वे जिल्हा अधिवेशन चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे आज पार पडले. या अधिवेशनात विविध ठराव पारित करण्यात आले.

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. विशेष अतिथी म्हणून आमदार प्रा. अनिल सोले, स्वागताध्यक्ष आमदार डॉ. देवराव होळी, शिक्षक आमदार नागो गाणार, भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल वरघंटे, शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष के.के.वायपेयी, जिल्हाध्यक्ष सत्यम चकिनारप उपस्थित होते. या अधिवेशनात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करुन विविध ठराव पारित करण्यात आले. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू, अशी ग्वाही यावेळी खा.नेते, आ. सोले, आ. होळी व आ.गाणार यांनी दिली. या अधिवेशनाला जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …