Breaking News

*मकर संक्रातीच्या पावन पर्वावर प्रार्थना महोत्सव व जन्मोत्सव सोहळा*- *ताज आश्रम सावंगी येथे उसळणार भाविकांची अलोट गर्दी*

*मकर संक्रातीच्या पावन पर्वावर प्रार्थना महोत्सव व जन्मोत्सव सोहळा*

*ताज आश्रम सावंगी येथे उसळणार भाविकांची अलोट गर्दी*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सावनेर*

*मा.सुनील बाबू केदार दुग्ध विकास व पशु संवर्धन, क्रीडा व युवा कल्याण मंत्री महाराष्ट्र शासन व मा.रविन्द्र ठाकरे जिल्हाधिकारी नागपूर सह अनेक गणमान्याची उपस्थिती लाभनार*


*सावनेरःतालुक्यातील सावनेर शहरापासुन पाच की.मी.अंतरावर स्थीत ताज आश्रम सावंगी येथे दरवर्षी प्रमाणे मकर संक्रातीच्या पावन पर्वावर ब्रम्हलीन परम पुज्य भैय्याजी महायाज यांच्या जयंती निमित्ताने महाराजांनी रचलेल्या “अध्यात्मपर प्रार्थना स्त्रोत्रावर आधारीत प्रार्थना मोहत्सव व जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.*
*प.पू.भैय्याजी महाराज यांच्या पावन सानिध्याने व ख्यातीने पावन या ताज आश्रम सावंगी क्षेत्राचे नाव पंचक्रोशीत लौकीक होऊण संपूर्ण देश विदेशात महाराजांच्या अनुग्रहित भाविकांची अलोट संख्या असुन महाराजांनी “अध्यात्मपर प्रार्थना स्त्रोत्राची” रचना केली असुन हा ग्रंथ जगभरातील ग्रंथांचे सारतत्व विशद करणारा पवित्र ग्रंथ आहे.या ग्रंथातुन मानव धर्म,सनातन धर्म,संस्कार, संस्कृती ची शिकवण व त्यातून मानवाप्राप्ती बंधूभाव सोबतच सर्वधर्म समभाव होण्यास सहाय्यभूत ठरत आहे*
*मकर संक्रातीच्या पावन पर्वावर दि.15 जानेवारी रोज बुधवार ला या पवित्र ग्रंथावर ह.भ.प.अँड्.श्री जयवंत महाराज बोधले,पंढरपूर यांचे प्रवचनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी मा.सुनील केदार दुग्ध विकास व पशु संवर्धन,क्रीडा व युवा कल्याण मंत्री महा.शासन तसेच मा.रविन्द्र ठाकरे जिल्हाधिकारी नागपूर सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे.सदर आयोजनाचा लाभ जास्तीत जास्त भाविक मंडळीने घ्यावा अशी विनंती श्री.दामोधरजी उपाख्य बाबासाहेब बुधोलीया यांनी केली आहे*
*सदर यात्रेकरिता नागपूर च्या मुख्य बस स्थानकासह सावनेर,कळमेश्वर,काटोल येथून थेट ताज आश्रम सावंगी अशी एस टी बस ची व्यवस्था करण्यात आली आहे हे विशेष*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …