*अंगद सिंग च्या मारेकर्यांना फासी द्या*-*हजारो महिला,पुरुष,युवक युवतींचा भव्य कँडल मार्च*

*अंगद सिंग च्या मारेकर्यांना फासी द्या*

*अंगद सिंग हत्याकांड फास्ट ट्राँक वर चालवा*

*हजारो महिला,पुरुष,युवक युवतींचा भव्य कँडल मार्च*

*घटनास्थळी पोहचून वाहली श्रध्दांजली*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरः येथील नागपूर रोड वरील नाग मंदिर परिसरात दि.12 जानेवारी ला घडलेल्या निर्दयता पुर्वक “अंगद सिंग हत्याकांड”च्या विरोधात अंगद सिंग मीत्र परिवार व वेकोली परिसरातील हजारो महिला पुरुष, युवक युवतींनी घटनास्थळी येऊण मु्तक अंगद सिंग यांच्या मारेकऱ्यांला फासी द्या अशी मागणी करत जळत्या पणत्या घटनास्थळी ठेवून दोन मीनीट मौन पाळून मु्तक अंगद सिंग ला श्रध्दांजली वाहली*


*दि.14 जानेवारीला सायंकाळी 7-00 वाजता वेकोली परिसरातील भगवा चौकात संतप्त नागरिकांची गर्दी वाढू लागली व बघता बघता ही गर्दी हजारोत वाढून प्रत्येकाच्या हातात जळत्या पणत्या व “अंगद हम शर्मीदा है,तेरे कातील जिंदा है”,फासी दो फासी दो अंगद सिंग के हत्यारो को फासी दो अश्या गगनभेदी घोषणात कँडल मार्च ला सुरुवात होऊण भगवा चौक,शक्ती नगर,बजाज काँलोनी,आंबेडकर चौक,हाँटमेंट,वाघोडा असे संपूर्ण वेकोली परिसर भ्रमन करित घटनास्थळ नाग मंदिर नागपूर रोड येथे पोहचून ज्या ठिकाणी हत्यार्यांनी अंगद सिंगची निर्दयता व अमानवीय रीत्या हत्या करण्यात आली त्या ठीकाणी जळत्या पणत्या ठेवून सदर हत्या प्रकरणात शामील अन्य आरोपींना तात्काळ अटक करुण सदर प्रकरण अती जलद न्यायालयातचालवून दोषींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली.*


*सदर कँडल मार्च मधे नव नियुक्त जिल्हा परिषद सदस्या ज्योती अनिल सिरसकर,मेवालाल गुप्ता,युवक काँग्रेसचे सावनेर विधानसभा अध्यक्ष राजेश खंगारे,श्याम चव्हाण, राकेश सुर्यवंशी,सचिन मोहतकर,रवीराज इंगोले,अमर गुप्ता,सुनील ढोके,रामसींग टेकाम,प्रशांत ठाकरे,राहुल सावजी,संदीप मीश्रा,गोलू शाहु,शिप्रा खेडकर,माया धुर्वे,संगीता उईके आदिंच्या मार्गदर्शनात हजारो महिला पुरुष,युवक युवतींनी शांतता पुर्वक आपला निषेध नोंदविला*


*याप्रसंगी सावनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांनी संतप्त जमावास सांगितले की पोलीसांचा तपास योग्य दिशेने सुरू असुन घटनेचा मुख्य आरोपी नरेंद्र जयशंकर सिंग (39) सोबतच त्याचा मित्र विकास महेश बघोटीया वय (28) रा शक्ती नगर वेकोली वाघोडा यास अटक करण्यात आली असून सदर घटनेची व सुरक्षा कँमेर्यातुन मिळालेल्या पुराव्याचे सुक्ष्म अवलोकन तसेच मु्तक अंगद सिंग च्या मोबाईल वरील इतर काँल डीटेल व अन्य इतर बाबींवर पोलीस प्रशासन सुक्ष्म तापास करत असुन सदर घटनेत शामील असणार्या आरोपींना लवकरच जेरबंद करण्यात येणार असल्याची माहिती उपस्थितांना देऊण संतप्त जमावास समजुत घालून शांत केले*
*घटनास्थळावर मु्तक अंगद सिंग चा सैन्य दलात सेवारत भाऊ दिपक सिंग,छोटा भाऊ चंदन सींग व मोठी बहीण तसेच सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तेजसिंग सावजी पोलिस निरिक्षक अशोक कोळी आदिंच्या उपस्थितीत दोन मिनीट मौन पाळून मु्तक अंगद सिंग ला श्रध्दांजली वाहून कँडल मार्च ची सांगता करण्यात आली*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …