कुसूंबीत आदिवासी कोलाम बांधवानि खदानी केल्या बंद
आदिवासी कोलाम बांधवांचा आक्रोश तीव्र.
मानिकगढ सिमेंट प्रशासनाकडून आदिवासीयांचा छळ थांबणार तरी कधी.?
विशेष प्रतिनिधि- गौतम धोटे
माणिकगढ सिमेंट प्रशासनाने कित्येक वर्षांपासून आदिवासी व कोलाम बांधवांच्या जमिनी हिरावून अनधिकृतपणे कब्जा करत उत्खनन केले असून आदिवासी बांधवांची ये जा करण्याची वाट सुद्धा अळविण्यात आली आहे.त्या रस्त्यांची वाट खुली करुन द्यावी व आमच्या मागण्या प्रशासनाने पूर्ण कराव्यात त्या साठी आम्ही सिमेंट दगड खाणी बंद पाडल्या असून आम्हाला रस्ता खुला करून देईपर्यंतन दगड खाणी चे काम बंद करून बेमुद्दत आंदोलन करत राहू अशी प्रतिक्रिया आदिवशियानी सकाळशी बोलताना दिली
मानिकगढ सिमेंट प्रशासनाने जमिनी हिसकावून आम्हा आदिवासीयांवर अन्याय केला असून अन्याय आणखी किती वर्षे आम्ही सहन करायचा असा सवाल त्यांनी शासनाला केला आहे.
लिंगनडोह – नोकरी कोसुमबी रस्त्यावर निहामबाह्य असलेले गेट काढून रस्ता खुला करा, संपूर्ण उत्खननाची एटीएस मोजमाणप करा,संपूर्ण ताब्यातील जमिनीची भूमाणपन मोजणी करून कंपनीचे अनधिकृत अतिक्रमण हटवा, सर्वजनिक बांधकाम विभागाच्या फुलांचा वापर बंद करून नागरिकांसाठी ये जा करण्यासाठी खुला करावा,बेकायदेशीर 14 आदिवासी कोलामाची उत्खनन केलेल्या व बळकावलेल्या जमीनीचा मोबदला द्या , नोकरी खुर्द येथील आदिवासींची निहामबाह्य जमीन खरेदी विक्री रद्द करून 7/12 दुरुस्त करा, आदिवासी कोलाम प्रकल्प ग्रस्तान नोकरी द्या , वंचित आदिवा सी कोलाम कुटुंबांना विस्थापित पुनर्वसन अनुदान देण्यात यावा ,प्रलंबित आदिवाश्यांच्या तक्रारीची चौकशी , व सेवा हमी कायद्याची मायममली करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाही करावि अशी मागणी आदिवासी कोलाम बांधकडून करण्यात आली .
Maharashtra News Media सच की आवाज