अवैध वाळू वाहणारे सहा ट्रक्टोर जप्त.
विशेष प्रतिनिधि -तुषार कुंजेकर
खात– मौदा तालुक्यातील पिंपळगांव व सिरसोली वाळूघाटावरून वाळूची चोरी करून वाहतूक केल्याप्रकरणी सहा ट्रक्टोरवर महसूल विभागाने धडक कारवाई केली.
पहाटे पाच ते सहा वाजताच्या दरम्यान पिंपळगांव व सिरसोली वाळूघाटावर वाळूतस्करी सुरु असल्याची माहिती महसूल विभागाचे मंडळ अधिकारी रामचंद्र डांगरे यांना मिळाली.त्यांनी तलाठी न्रुपराज पर्वते, दिलीप कापगते, स्वप्नील देशमुखयांच्या चमूने ट्रक्टोरधारकांना ताब्यात घेऊन त्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांना दिली त्यानंतर घटनास्थळी तहसीलदाराचा ताफा दाखल झाला.सहाही ट्रक्टोर जप्त करण्यात आले यामध्ये एम एच ४०/ए एल ११०९,एम एच ४०/एई ०३९३,एम एच ४०/एल ९५३४,एम एच ४०/ए एम २२३२,एम एच ४०/ए एम २२२८,एम एच ४०/ए एम २३४६ चा समावेश आहे.सर्व ट्रक्टोर अरोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
मंडळ अधिकाराच्या माहितीनुसार वालूतस्करीसाठी घाटावर जातो त्यावेळी एक वाहन आमचा सातत्याने पाठलाग करते त्यामुळे कधी काय होईल सांगता येत नाही जीव मुठीत घेऊन गस्त करावी लागते पोलिस सरक्षण अधिक वाढवावे अशी मागणी होत आहे.