Breaking News

*थोर नाटकार,साहित्यिक कै.राम गणेश गडकरी यांना 101 व्या पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन*

*थोर नाटकार,साहित्यिक कै.राम गणेश गडकरी यांना 101 व्या पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन*

*प्रतिनिधी -सुरज सेलकर ,सावनेर*

*गणेश वाचनालय,गडकरी युवा मंच,राम गणेश गडकरी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आदींचे पदाधिकारी व

विद्यार्थ्यांसह शेकडो गडकरी प्रेमींचा उत्सुफुर्त सहभाग*


*अनेक मान्यवरांनी वाहली भावपूर्ण श्रध्दांजली*

*सावनेरः थोर नाटकार साहित्यिक, भाषाप्रभू व शेक्सपियर उपाधि ने नावाजलेले कै राम गणेश गडकरी यांचा वारसा जपनार्या सर्व संस्थां,नगरीतील गडकरी प्रेमीनी भव्य मिरवणूकीच्या माध्यमातून नगरीच्या मुख्य मार्गाने एकत्र येऊण सकाळी 9-00 वाजता त्यांचे निवास स्थान,समाधी स्थळ,पुतळा व गणेश वाचनालय येथे पोहचून कै.राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीस अभिवादन करित त्यांना भावपूर्ण श्रध्दांजलि वाहली.*


*कै.राम गणेश गडकरी यांच्या 101 व्या पुण्यतिथि निमित्ताने पुरातत्व विभागाव्दारे संरक्षीत त्यांचे निवास स्थानावर पुरातत्व विभाग नागपूर च्या सहायक संचालक श्रीमती वाहने यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश वाचनालय चे अध्यक्ष अँड् चंद्रशेखर बरेठीया,माजी अध्यक्ष अँड् श्रीकांत पांडे,डॉ जयंत कुळकर्णी ,गडकरी युवा मंच चे अध्यक्ष किशोर ढुंढेले,गडकरी महाविद्यालयाचे अध्यक्ष युवराज टेकाडे सह शेकडो गडकरी प्रेमी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून भावपूर्ण श्रध्दांजली वाहून थोर नाटककार,भाषाप्रभू,कै.राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीस उजाळा दिला.व पर्व मान्यवर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सामुहिक भव्य अशी मिरवणूक काढुन”राम गडकरी अमर रहे,राम गणेश गडकरींचा विजय असो” असा घोष करित समाधी स्थळ,गडकरी पुतळा,गणेश वाचनालय,राम गणेशगडकरी नाट्य मंदिर इत्यादी ठीकाणी पोहचून त्याच्या स्मृतीस अभिवादन करुण श्रध्दांजली वाहली*


*गडकरी स्मृती निलयम द्वारे सावनेर शहरात कै.राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीस जपणारे तसेच साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्या समाजसेवींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले त्यात पद्मगंधा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शुभांगी भडभडे,रंजन दारव्हेकर,सीमा जोशी,अँड् श्रीकांत पांडे,अँड् चंद्रशेखर बरेठीया,डोमासाव सावजी,गोपाल घटे सह अनेक सीने कलाकार व मान्यवरांचे शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊण सन्मानित करण्यात आले*


*याप्रसंगी पुरातत्व विभाग नागपूर व्दारे गडकरी निवास स्थानाला सुंदर असे फुल माला व विद्यूत रोशनाई ने तर नगर पालिका सावनेर व्दारे समाधी स्थळ व पुतळ्याची आकर्षक सजावट केली होती हे विशेष…*
*याप्रसंगी नरसिंग हजारी,रधुनंदन जामदार,मुरलीधर पुरे,राजपुते सर,सुधाकर दहिकार अँड् पुरे,राम गणेश गडकरी युवा मंच चे अध्यक्ष किशोर ढुंढेले,सचिव प्रथमेश देशपांडे,सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तेजसिंग सावजी,अमित झोडापे,श्याम धोटे,गोपाल घटे,दत्ता धोटे,दिलावर शेख सह नगरातील सर्व गडकरी प्रेमी तसेच कै.राम गणेश गडकरी कनिष्ठव वरिष्ठ महाविद्यालय चे सर्व शिक्षक वु्ंद व शेकडो विद्यार्थ्यांनी भाग घेऊण आपल्या लाडक्या थोर साहित्यिक, भाषाप्रुभू व शेक्सपियर या उपाधिने जग प्रसिद्ध कै.राम गणेश गडकरी यांना त्यांच्या 101 व्या पुण्यतिथि निमित्ताने आयोजित श्रध्दांजली चा कार्यक्रम यशस्वी करण्यास परिश्रम घेतले*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …