*राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त ” बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ ” रॅलीचे आयोजन*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी -दिलीप येवले
कोराडी– तायवाडे महाविद्यालय महादूला -काेराडी येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त कोराडी-महादूला गावातून वजांरी भवन(भारत माता चौक)पासून तायवाडे महाविद्यालयापर्यत प्रभात फेरीच्या माध्यमातून गावातील लोकांमध्ये जाग्रुती निर्माण करण्याचा विद्यार्थ्यांकडून प्रयत्न केला.
हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे यांच्या मार्गदर्शनात श्री.रत्नदिप रंगारी,माजी नगरसेवक,नगर पंचायत महादूला यांच्या उपस्थितीत सपंन्न झाला.
या रॅलीद्वारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी “खूशहाल बालिका भविष्य देश का” ,”बरोबरी का साथ निभाओ,महीलाओ अब आगे आओ”,”बेटीपर अभिमान करो,जन्म होने पर सन्मान करो”,बेटी माता-पिता की पहचान है,देश का अभिमान है”,”बेटी है कूदरत का उपहार,जिने का इसको दो अधिकार”,बेटी बचाओ,बेटी पढ़ाओ” इत्यादी श्लोगनाने विद्यार्थ्यानी गावातील लोकांमध्ये जाग्रुती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.किशोर घोरमाडे ,सदस्य डॉ.वर्षा वैद्य,डॉ.शरद डवरे,डॉ.वकील शेख ,प्रा.सुनिल घुगल यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.