*नेताजी सुभाषचंद्र जयंती निमित्त जिलास्तरिय योगासन प्रतियोगिता संपन्न*

*नेताजी सुभाषचंद्र जयंती निमित्त जिलास्तरिय योगासन प्रतियोगिता संपन्न*


*40 स्पर्धकांचा उत्सफुर्त सहभाग*


*विजयी खेळाडू राज्य स्तरीय प्रतियोगीते करीता पात्र*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*नागपूरः पतंजलि योग पिठ हरिव्दार च्या दिशानिर्देशानूसार महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशातील प्रत्येक जिल्ह्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्ताने “भव्य योगासन” (प्रथम चरणाच्या) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते*


*दि.23 जानेवारी ला पतंजलि योग समिती जिल्हा नागपूर व्दारे मा.प्रदीप काटेकर (जिल्हा प्रभारी भारत स्वाभिमान),मा.छाजुराम शर्मा (जिल्हा प्रभारी पतंजलि योग समिती),मा.उर्मिला ताई जुवारकर (जिल्हा प्रभारी महिला पतंजलि),मा.पंकज बांते (जिल्हा प्रभारी युवा भारत) यांच्या मार्गदर्शनात नागपूर जिल्ह्यातील स्पर्धा तिरळे कुणबी समाज भवन रिंग रोड आशीर्वाद नगर नागपूर येथे सकाळी 10-00 ते 3-00 च्या दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामध्ये ४० मुले,मुली सहभागी होऊण नटराजासन,पाद हस्तासन,भु-नमनासन,बकासन,धनुरासन,विरभद्रासन,पदम शीर्षासन सारखे कठीण आसनांचे सहज प्रत्याक्षित करुण आपल्या योगासन कौशल्याचे प्रदर्शन करुण उपस्थितांना आपल्या लवचीक शरीरयष्टीचा परिचय दिला.नागपूर जिल्ह्यातील पहिला चरणाच्या सदर योगासन स्पर्धेचे 9 ते 14 व 15 ते 25 अश्या वेगवेगळ्या वयोगटातील मुले व मुलींंच्या स्पर्धेतील प्रथम व व्दितीय विजेत्यांची राज्यस्तरा करिता निवड करण्यात आली*


*स्पर्धेचे निकाल योग्य व निष्पक्ष होण्या करिता जिल्हा योगासन असोशियेशन चे योगासन तज्ञ संदेश खरे व त्यांच्या चमुंनी पंचाची भुमिका सुरेख पणे पार पाडून विजेता चमूंना मेडल व प्रशस्ती पत्र व स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना नगरसेवीका श्रीमती स्नेहल बिहारे व भारत स्वाभिमान चे जिल्हाध्यक्ष प्रदीप काटेकर,पतंजलि योग समितीचे जिल्हा प्रभारी छाजुराम शर्मा आदिंच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊण सन्मानित करण्यात आले*


*सदर आयोजनाच्या यशस्विते करिता पंकज बांते,भावना टेम्भरे,कमल गुप्ता,दिपक येवले,पावडे सर,रितू जरगर,निखील भुते,शोभा बीहारे,रसिका आसोले,शारदा वर्हाडे सह दक्षिण नागपूर चे पदाधिकारी व दिघोरी नियमित योग वर्गाचे साधक साधिकांनी आदींनी परिश्रम घेतले*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …