*रेती चोरट्यांचा तहसीलदारांना ट्रक ने चिरडण्याचा प्रयत्न* *थोडक्यात बचावले तहसीलदार दिपक कारंडे*

*रेती चोरट्यांचा तहसीलदारांना ट्रक ने चिरडण्याचा प्रयत्न*
*थोडक्यात बचावले तहसीलदार दिपक कारंडे*


*नांदागोमुख- काटोल मार्गावरील घटना*
*रेती तस्करांच्या वाढत्या धाडसीमुळे कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचाऱ्यांच्या परिवारात भितीचे वातावरण*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत स्थानिक प्रतिनिधी सुरज सेलकर*

*सावनेरः मध्यप्रेशातून महाराष्ट्र वाहत येणार्या कन्हान नदीच्या बारीक रेतीची बांधकामा करिता मोठी मागणी आहे व रेतीच्या व्यवसायातून गडगंज कमाई होत असल्याने या व्यवसायात आता स्पर्धा निर्माण होऊण वर्चस्वाचा खेळ सुरु होऊण या व्यवसायात चोरी,तस्करी सारखे प्रकार नित्याची बाब झाली आहे*


*सावनेर तालुक्यातील रेती घाट बंद असल्याने महाराष्ट्राच्या सीमालागत मध्यप्रदेशातील लोहाणा घाटावरुण मोठ्या प्रमाणात अवैध रीत्या रेती परिवहन होत आहे व असेच अवैध परिवहन होत असल्याची माहिती सावनेर तहसीलदार यांना कळताच त्यांनी शुक्रवार दि.24 जानेवारीला केळवद पोलीस स्टेशन हद्दीत आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना सोबत घेऊण गस्त करत असतांना एम.एच.40 बी.एल.0254 क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगाने येत असल्याचे निदर्शनास येताच त्याला थांबून विचारपुस केले असता त्यांचे जवळ रेती परिवहनाचा परवाना नसुन ट्रकमधे ओव्हर लोड रेती असल्याचे निदर्शनास येताच कागदोपत्री कारवाई ला सुरुवात करत असताच परत अश्याच प्रकारे अवैध तर्हेने चार पाच ट्रक वाहतूक करत असल्याची सुचना तहसीलदार दिपक कारंडे यांना प्राप्त होताच सदर ट्रक ची कागदोपत्री कारवाई करण्याची सुचना सोबत असलेले नायब तहसीलदार जयसींग राठोर यांना देउण ते पुढे रवाना झाले*
*तहसीलदार व त्यांचे इतर कर्मचारी घटनास्थळावरुण हलताच ट्रक चालकाने तपास अधिकारी यांना हुलकावणी देऊण घटना स्थळावरुण ट्रक घेऊण पळ काढला असता सदर घटनेची माहिती पुढे गस्तीवर असणार्या तहसीलदार व कर्मचाऱ्यांना दीली असता त्यानी भरधाव येत असलेल्या ट्रक ला हात देऊण थांबविन्याचा प्रयत्न केला असला ट्रक चालकाने ट्रक थेट अंगावर आणत पळण्याचा प्रयत्न केला असता तहसीलदार सावनेर यानी आपले शासकीय वाहन क्र.एम.एच.40 एफ 559 ने पाठलाग करुण रस्त्यात दोन तीन दा त्यास थांबविन्याचा प्रयत्न केला असता नांदा शिवारात परत ओव्हटेक करुण शासकीय वाहन रस्त्यावर आडवे करुण थांबविन्याचा प्रयत्न केला असता ट्रक चालकाने चक्क शासकीय वाहनावर भरधाव वाहन चढवत कट मारून पळ काढला याप्रसंगी तहसीलदार व कर्मचाऱ्यांनी स्वताला सवरत रस्त्याच्या बाजूला झाले नसते तर मोठा दुर्दैवी प्रकार घडला असता*


*अश्यात स्वताःला सावरत परत ट्रकचा पाठलाग सुरुच ठेवल्याने ट्रक चालकाने कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील तेलगाव कामठी गावात शीरून ट्रक चालका सह क्लिनर ने पळ काढला.आखेरीस तहसीलदार व त्यांच्या भरारी पथकाने ट्रक सहीत 8 ब्रास अवैध रेती ताब्यात घेऊण कळमेश्वर पोलीसात जमा करत घटनेचीतक्रार केळवद पोलीसात नोंदवली असुन पुढील तपास सुरू आहे*
*अवैध रीत्या रेतीचे परिवहन करणारा ट्रक हा जलालखेडा येथील जलालूद्दीन मुस्तफा याचा असल्याचे उघडकीस येत आहे.कर्तव्यावर असणार्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर असे जिवघेण्या प्रकारात सातत्याने वाढ होत असल्याने कर्तव्यदक्ष शासकीय कर्मचाऱ्यांच्या परिवारात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे*
*अवैध रुपाने जोमात फोफावत असलेल्या या रेती व्यवसायास राजकारणी पठबळ व सौरक्षण प्रात असल्याने आता हे रेती चोरटे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जिवावर सुध्दा हात घालण्यात मागेपुढे पाहत नसल्याचे बोलल्या जात आहे*
*कर्तव्य जीवावर बेतो अथवा काही हो कर्तव्य तर कर्तव्यच व परिवाराच्या उत्थाना करिता तर जीव मुठीत घेऊण कर्तव्य करावेच लागणार असे भरारी पथकातील गस्तिवर असणार्या अधिकारी कर्मचारी यांचे मत आहे*
*सदर घटनेत तहसीलदार दिपक कारंडे,नायब तहसीलदार जयसिंग राठोर,महसूल कर्मचारी सुजीत आडे,गणेश मोरे सह शासकीय वाहन चालक आदिंचा सहभाग होता*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …