रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालयात येथे कर्तव्यबोध पखवाडा
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी -दिलीप येवले*
*छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 22. 01. 2020 रोजी कर्तव्यबोध पखवाडा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर संजय दुधे यांनी आपल्या भाषणात मुलांना कर्तव्य बोध बद्दल योग्य मार्गदर्शन केले. त्यांनी मुलांना आजच्या आवश्यक य शैक्षणिक गरज समजावून त्यावर विचार करण्यात प्रोत्साहित केले. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य पंकज झगडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले संस्थेचे संचालक डॉक्टर मारुती वाघ तसेच संस्थेच्या संचालिका लता वाघ व संस्थेच्या प्रर्यवेक्षिका प्राध्यापक स्नेहल वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला बीए, बी.बी.ए व बी.सी.सी.ए. चे विद्यार्थी व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.*