*गुमथी येथील दिव्यांग मुलामुलींची विशेष शाळा कर्मशाळेत प्रजासत्ताक दिन साजरा*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
*दिव्य ज्योती मतिमंद मुला मुलींची विशेष शाळा व संत सिताराम महाराज प्रौढ मतिमंदाची निवासी कर्मशाळा व पुर्नवसन केंद्र, यांचे संयुक्त विद्यमाने गुमथी तालुका कामठी जिल्हा नागपूर येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुकुंद महाराज धोटे भागवत प्रवक्ते, यादव महाराज किर्तन प्रवक्ते, यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आला व विशेष अतिथी म्हणून संस्थेचे संस्थापक सूर्यभान मोरे, अशोक मोरे, गौतम मानवटकर, धनराज खडसे, शुद्धधन मानवटकर, नरेंद्र मोरे, तसेच शाळेचे संचालक आशिष मोरे, प्रामुख्याने उपस्थित होते. ध्वजरोहनानंतर मतिमंद विद्यार्था द्वारे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये गायन, वादन, नृत्य, वेशभूषा स्पर्धेच्या समावेश होता. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन शाळेतील शिक्षिका ममता वाडेकर तसेच आभार प्रदर्शन प्रियंका चव्हाण यांनी केले. कार्यक्रमामध्ये शाळेचे मुख्याध्यापक पिल्लेश्वर मोरे, शाळेच्या अधीक्षिका अंजली मोरे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांचे बहुमूल्य योगदान लाभले.*
Maharashtra News Media सच की आवाज