Breaking News

*महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथे गणतंत्र दिन साजरा*

*महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथे गणतंत्र दिन साजरा*


खापरखेडा प्रतिनिधी- प्रमोद येवले
*महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथे 71 वा गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र न्यूज मीडिया चे उप जिल्हा प्रतिनिधी तसेच अनेक वर्तमान पत्रातून आपल्या कुशल लेखनीने न्याय मिळवून देणारे व्यक्तिमत्त्व मा.दिलीप येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व त्यानंतर संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले ध्वज व मान्यवरांना मानवंदना दिली कार्यक्रम दरम्यान ग्रामपंचायत चिंचोली माजी उपसरपंच अस्मिता बागडे यांनी राज्यघटनेचे महत्त्व सांगितले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून योग क्षेत्रातील अग्रीन्य पतंजलि योग समिती,भारत स्वाभिमान चे तालुका सह प्रभारी लक्ष्मण काळे लाभलेले होते. सामाजिक कार्यकर्त दिलीप येवले (पत्रकार) यांनी राज्य घटनेने दिलेला अधिकाराच्या विद्यार्थ्यांनी उपयोग करून एक उत्तम नागरिक बनावे अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाला योग शिक्षक रंगराव ठाकरे, लक्ष्मण हरडे, नरेश तरारे, पुरुषोत्तम मानकर अतिथी म्हणून लाभलेले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्‍वागत केंद्र प्रमुख प्रकाश कोहळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शालू टेकाडे यांनी केले.*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …