Breaking News

मध्यरात्रीचा थरार आणि एटीएम चोरी करणारी टोळी गजाआड -*गुन्हे शाखेची म़ोठी सफलता*

मध्यरात्रीचा थरार आणि एटीएम चोरी करणारी टोळी गजाआड


 परप्रांतीय एटीएम चोरी करणारी टोळी गजाआड

*चोरटे राजस्थान राज्यातील नागोर व पुष्कर जिल्ह्यातील*

*गुन्हे शाखेची म़ोठी सफलता*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
नागपूरस्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामिण ची कारवाई एटीएम मशीन चोरी करणारी टोळी मागील तीन महीन्यांपासुन नागपूर ग्रामीण, नागपूर शहर, व वर्धा जिल्हयात वारंवार मालवाहु कॅम्पर वाहन चोरून, त्या चोरलेल्या वाहनाचे मदतीने एटीएम मशीनमध्ये असलेल्या पैशांसह, एटीएम मशीन चोरी करण्याच्या घटना करीत होते. अशा प्रकारे या टोळीने, सर्वप्रथम दिनांक 11.10.2019 रोजी नागपूर ग्रामीण मधील पोलीस ठाणे खापरखेडा हद्दीतील दहेगाव येथुन मालवाहु कॅम्पर गाडी चोरून नेली व दिनांक 13.10.2019 रोजी काटोल येथे बॅक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम मशीन  16,00,000/-रू. नगदी कॅशसह जमीनीतुन उखडुन चोरून नेले. त्यांनतर या टोळीने दिनांक 2.12.2019 रोजी काटोल येथुन, आणखी एक कॅम्पर वाहन चोरून नेले व दि.  3.12.2019 रोजी नागपूर – अमरावती मार्गावरील पोलीस ठाणे कोंढाळी हद्दीतील बाजारगाव, येथील बँक ऑफ इंडीयाचे एटीएम मशीन पैशांसह चोरी करण्याचा प्रयत्न करीत असतांना, पोलीसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा चोरीचा प्रयत्न असफल ठरला. परंतु नमुद आरोपी हे त्यांचे ताब्यातील वाहनाने भरधाव वेगाने पळुन गेल्याने पोलीसांचे हाती लागले नाही. त्यानंतर नमुद टोळीने काटोल येथुन चोरून नेलेल्या याच कॅम्पर वाहनाने दिनांक 6.12.2019 रोजी पाटणसावंगी येथील सूतगीरणी जवळ असलेले ओव्हरसीस बँकेचे एटीएम मशीनसह 2,83,000/- रू. चोरून नेले. त्यानंतर याच टोळीने दिनांक 30.12.2019 रोजी नागपूर – अमरावती रोडवरील वाडी पोलीस स्टेशन हद्दीतील बँक ऑफ इंडीया चे एटीएम मशीनसह  4,00,000/- रू. चोरून नेले. त्यानंतर याच टोळीने दिनांक1.1.2020 रोजी सेवाग्राम, जिल्हा वर्धा येथील इंडीकॅश बॅकेचे एटीएम मशीन12000/-रू. सह चोरून नेले, त्यानर सेलु, जिल्हा वर्धा येथील बँक ऑफ इंडीया चे एटीएम मशीनसह 6.94.000/-रू.सह चोरून नेले, त्यामुळे नमुद टोळीला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलीसांपुढे होते. वारंवार होणार्या एटीएम चोरीच्या घटनेची गंभीर दखल वरीष्ठ पातळीवरही घेण्यात आल्याने नमुद टोळीला जेरबंद करण्यासाठी पोलीसांवर मोठा दबाव होता. त्याप्रमाणे नागपूर ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अनिल जीट्टावार त्यांचे पथकासह अहोरात्र परीश्रम घेत या टोळीच्या मागावर होते. त्यानंतर एटीएम मशीन चोरी करणार्या याच टोळीने पोलीस ठाणे खापरखेडा हद्दीतील दहेगाव येथुन, दिनांक 24.1.2020 रोजी एक पिकअप गाडी चोरून नेली व सदर गाडी पिपळा शिवारात बंद पडल्याने तेथेच सोडुन पुन्हा त्याच रात्री दहेगाव येथुन वैभव कृषी सेवाकेंद दुकाना समोरून एम एच 40 वाय  3544 ही महींद्र बोलरो पिकअप गाडी चोरून नेली. नमुद टोळीचा नागपूर गामिण गुन्हे शाखा पोलीसांना योग्य प्रकारे अभ्यास झाल्याने, त्यांचेकडुन एटीएम चोरीची घटना होणार याची खात्री झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अनिल जिट्टावार यांनी नमुद टोळीला जेरबंद करण्याकरीता योग्य नियोजन तयार करून, गुन्हे शाखेचे तीन पथक आरोपीच्या शोधकामी रवाना केले. त्यानुसार गुन्हे शाखेचे एका पथकातील स्टॉफ हेकॉ चंद्रशेखर घडेकर, चालक नापोशि अमोल कुथे, पोशि रोहन डाखोरे, विपीन गायधने व बालाजी साखरे हे दिनांक 25.1.2020 रोजी रात्री च्या सुमारास गस्त करीत असतांना, त्यांना एम एच 40 वाय 3544 ही महींद्र बोलरो पिकअप गाडी रात्री  3-00 वा चे दरम्यान पाटणसावंगी येथील खापा टी पॉइंटवर पाटनसावंगी कडे जातांना दिसली. नमुद वाहनामध्ये एटीएम चोरीची टोळी असल्याची पोलीसांना खात्री झाल्याने, पोलीसांनी शासकीय वाहनाने नमुद वाहनाचा पाठलाग सुरू केला असता आरोपी हे सुसाट वेगाने त्यांचे वाहन पळवु लागले. पोलीस पाटनसावंगी, सावरमेंढा, माउरझरी, फेटरी मार्गे आरोपींचा सतत पाठलाग करीत आले असता,पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीतील कळंबी या गावाजवळ यातील एक आरोपी हा चालत्या वाहनात मागील भागान येवुन पोलीसांच्या दिशेने दगडांचा मारा करू लागला  तसेच पोलीसांची गाडी पंक्चर करण्यासाठी रस्त्यावर आरी, खिळ फेकु लागला. तरीही वाहनचालक अमोल कथे यांनी अतिशय धाडसाने वाहन चालवुन आरोपीताचे ताब्यातील वाहनाचा पाठलाग सतत सुरूच ठेवला . यातच पोलीसांचे दिशेने दगड फेकणार्या आरोपीने गाडीवरून उडी मारून अंधाराचा फायदा घेवुन पळु लागला. पोलीसांनी पळत जावुन त्यास ताब्यात घेवुन , त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने आपले नाव बहादुर पेहलादराम बावरी वय  30 वर्ष रा. कुलीयाना तालुका परबतसर, जिल्हा नागोर, राजस्थान अस सांगितल. तसेच पोलीसांनी पळत असलेला गाडीचा पाठलाग सतत सुरू ठेवला असता, आरोपीतांनी कळंबी गावाचे शेत शिवारात आपले वाहन लावारीस सोडुन पळ काढला, पोलीसांनी इतर आरोपींचा शोध घेणे सुरू केले असता, वाहनातील इतर आरोपी हे कडंबी व आलेसुर या दोन गावाच्या मध्ये असलेल्या मोठ्या डोंगरावरून वाडीचे दिशेने गेल्याचे समजले. त्याप्रमाणे पोलीसांनी पाच ते सहा किमी डोंगरातुन पाठलाग केला, परतु आरोपी हे पळुन जाण्यात यशस्वी झाले. पळून गेलेले इतर आरोपी हे त्यांचे मुळ गावी राजस्थान येथे जाण्यासाठी रेल्वे स्टेशन येथे येतील या अनुमानाच्या आधारे स्थानीक गुन्हे शाखेचे दोन पथके हे रेल्वे स्टेशन परीसरात पाठविण्यात आले . तेथे दुपारी  3.00 वा. दरम्यान एका ऑटोतुन तीन इसम उतरले असता त्यांचेवर पोलीसांना संशय आल्याने पोलीसांनी त्यांना विचारपुस केली असता सुरूवातीला त्यांनी आपली खोटी नावे सांगुन पोलीसांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांनी त्यांची अंगझडती घेतली असता एका आरोपीच्या ताब्यातन एक मास्टर चाबी मिळून आली, ती चाबी कळंबी येथे गाडी सोडलेल्या ठिकाणी मिळालेल्या चाबी सारखी असल्याने पोलीसाना खात्री झाली कि, हे देखील पकडलेल्या आरोपीचे इतर साथीदार आहेत.
पोलीसांनी त्यांना नाव पत्ता विचारलर असता त्यांनी आपले नांव
2.गोपालराम तेजाराम बावरी वय 23 वर्श,रा. राहुलीयावास ता. डेगाणा, जि. नागोर राजस्थान,
3. तुफान हनुमानराम बावरी वय 20 वर्श रा. राहुलीयावास ता. डोगाणा,जि. नागोर, राजस्थान
4. श्रीनिवास बतालाल बावरी वय 26 वर्श रा. नांद ता. पुश्कर जि. अजमेर राजस्थान सागीतले
अष्याप्रकारे चारही अरोपितांना रोजी स्थानिक गुन्हे षाखा येथे आणुन त्यांपा गुन्हयासंमंधी सखोल चैकषी केली असता त्यांनी 26.1.2020 खापा येथील देना बेंक एटीएम मषीन चोरी करण्या करीता जात असल्याचे सांगीतले. तसेच नमुद आरोपी हे नागपूर षहरात वाडी पो.स्टे. हद्दीतील दौलामेटी भागात दोन इिकाणी रूम किरायाने घेउन रहात होते.तसेच वर्धा येथील नागपूर वर्धा महा मार्गावर गावातील षेतातील फार्म हाउस किरायाने घेउन रहात होते.तसेच चोरी केलेल्या एटीएम मषीन  त्या किरायाच्या खोलीत नेउन ईलेक्ट्रीक कटर च्या साहयाने कापून तत्यातील कॅष काढून एटीएम मशीनचे तुकडे करून ईतरत्र शीवारात फेकुन देत असे.यात आरोपीने पोलीस स्टेषन खापरखेडा,काटोल,कोंढाळी,सावनेर,वाडी,सेवाग्राम,सेलू,खापरखेडा त्यादी पोलीस स्टेशन हद्दीतून एटीएम मशीन चोरी केल्याचे कबुल केले आहे.
नमुद आरोपी विरूद्ध राजस्थान तसेच ईतरही राज्यात एटीएम मषीन चोरी, वाहन चोरी, व ईतर चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे कळते.यात
1. बहादुर पेहलादराम बावरी वय 30 वर्श रा. कुलीयाना ता. परबतसर जि. नागोर, याचेवर एटीएम चोरीचे 10 गुन्हे,ईतर चोरीचे 4 गुन्हे नमुद आहे.
2. गोपाल तेजाराम बावरी वय 23 वर्श रा. राहुलीयावास,ता. डोगाणा जि. नागोर राजस्थान याच्यावर चारचाकी वाहन चोरीचे 8 गुन्हे दाखल आहे.
3. श्रीनिवास बंतालाल बावरी वय 26 वर्श रा. नांद ता. पुश्कर, जि. अजमेर राजस्थान याचेवर एटीएम मषीन चोरीचे  9 गुन्हे व ईतर चोरीचे 4 गुन्हे असे एकुण 13 गुन्हे दाखल आहे.
सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक राकेष ओला.अप्पर पोलिस अधिक्षक यांचे मार्गदर्षना खाली स्थानिक गुन्हे षाखेचे,पोलिस निरीक्षक री. अनिल जिट्टावार यांचे मार्गदर्षनाखाली सपोनि.जितेन्द्र वैराडे,पो.उनि.सचिन मत्ते,नरेन्द्र गौरखेडे,जावेद षेख,यांचे पथकातील सफौ. लक्ष्मीप्रसाद दुबे, बाबा केचे, पोहवा चंद्रषेखर घडेकर,गजेन्द्र चैधरी,मदन आसतकर,निलेष बर्वे,सुरज परमार,महेष जाधव,राजेन्द्र सनोडीया,नाना राऊत,सुनिल मिश्रा  दुर्गाप्रसाद पारडे,पोलीस नायक राम आडे,दिनेष आधापुरे,षैलेष यादव,पो.षि. रोहन डाखोरे,विपीन गायधने,बालाजी साखरे,राधेष्याम कांबळे,अमोल वाघ,प्रणय बनाफर,सत्यषीर कोठारे, वीरेन्द्र नरड,चासफै/ साहेबराव बहाळ,भाऊराव खंडाते,चापोना अमोल कुथे,गुन्हेषाखा नागपूर ग्रामिण यांनी पार पाडली.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …