*भांगे पब्लिक स्कूलचे सुयश*
*नागपूर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
*कामगार मनोरंजन केंद्र क्रमांक 2 तर्फ प्रजासत्ताक दिनानिमित्त समूह देशभक्तीपर नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोराडी औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजकुमार तासकर उपस्थित होते. सदर स्पर्धेत भांगे पब्लिक स्कूल पांजरा या शाळेला विविध गटात सात बक्षिसे मिळाली. कॉन्व्हेंट गटात दोन पारितोषिक तर प्राथमिक गटात 2 पारितोषिक उच्च प्राथमिक गटात 2 पारितोषिक मिळाली. माहीन खान ने एकल नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक भांगे पब्लिक स्कूलचे अध्यक्ष भांगे यांनी केले तसेच स्पर्धेकरिता मुख्यध्यापक स्मृती पाटील, रंजनी मोहतुरे, जयश्री हाडके, तसेच शाळेचे शिक्षक रजनी सुके, नुरजहा खान, अर्चना चौधरी, दर्शिका खोबरखेडे, चेतना राऊत, मनीषा निंदेकर, कांचन कापसे, शारदा एनिपुली, सरोज श्रिवात्रा, वर्षा बोंद्रे, नूतन बोंडे, चंद्रप्रकाश आगासे यांनी अथक परिश्रम घेतले*