*डाॅ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे सर्वांना समानता, सर्वांना समान अधिकार देणारा उत्सव म्हणजे प्रजासत्ताक दिन –

*डाॅ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे सर्वांना समानता, सर्वांना समान अधिकार देणारा उत्सव म्हणजे प्रजासत्ताक दिन –

हंसराज गं. अहीर*

कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे

चंद्रपूर जेल परिसरातील शहिद वीर बाबुराव शेडमाके स्मृतीस्थळी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न*

देशात सर्वांना समानता, सर्वांना समान अधिकार देणार संविधान डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल आहे ते आपण देशात 26 जानेवारी रोजी अंमलात आणल म्हणून आजचा दिवस या देषातील सर्व उच-निच, गरिब-श्रीमंत या सर्वांना समानतेचा दिवस असल्याने प्रजासत्ताक दिन म्हणून देषात साजरा केला जातो असे प्रतिपादन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर येथील जेल परिसरातील षहिद विर बाबुराव पुलेश्वर शेडमाके स्मृतीस्थळ येथे झेंडावंदन कार्यक्रम प्रसंगी केले.
प्रसंगी दयालाल कन्नाके, विलास मसराम, प्रा. अशोक तुमराम, नगरसेविका मायाताई उईके, शीतल कुळमेथे, ज्योती गेडाम, चंद्रकला सोयाम, षितल आत्राम, माजी महापौर अंजली घोटेकर, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, नगरसेवक राजेंद्र अडपेवार, नगरसेविका आषाताई आबोजवार, कल्पनाताई बगुलकर, रजनीताई हजारे, षितल गुरनुले, षिलाताई चव्हाण, वंदना तिखे, संगीता खांडेकर, सौ. गुडधेताई, मोनीशा महातव रेणुका घोडेस्वार, राजेंद्र तिवारी, मोहन चैधरी, राजु घरोटे, विकास खटी, संदिप देषपांडे, राहुल बोरकर उपस्थित होते.
पुढे बोलतांना हंसराज अहीर यांनी सांगीतले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारमधील सर्वांनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. ‘‘सबका साथ – सबका विकास’’ ही घोषणा लोकशाही ला धरून असून हे मंत्र, ही घोषणा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान आहे. लोकषाहीचा आदर करणारा संसदेत संविधानाची पुजा करणारा या देशाचा प्रधानमंत्री देशाच्या अखंडेकरिता, देशाच्या सुरक्षिततेकरिता, देशातील आतंकवाद, उग्रवाद संपविण्याकरिता, देशातील घुसखोरी थांबविण्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पाऊले उचलली असल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले.
सि.ए.ए. हा कायदा देशातील नागरिकांनी समजून घेतला पाहिजे. देशाच्या रक्षणाकरिता हा कायदा असून नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. कोणत्याही व्यक्तिचे नागरिकत्व काढण्यासाठी हा कायदा नसून या देषातील विरोधी पक्ष सिएए व एनआरसी च्या माध्यमातून जनमाणसात, धर्माधर्मात व्देश पसरिवण्याचा, देशात अस्थितरता पसरविण्याचा प्रयत्न काॅंगं्रेस व ईतर पक्ष करित असून जनतेने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडावा असे आवाहनही पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. 370 कलम रद्द करून काश्मीर हा या देशाचा अविभाज्य अंग आहे हे सिध्द केले असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी लोकशाही व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच संविधान हेच कामी येणार असल्याचेही ते म्हणाले. शहिद बाबुराव शेडमाके शहिद स्थळ हे सूवर्ण अक्षराणे लिहावे असे पवित्र स्थळ असून याठिकाणी मागील 4 वर्षांपासून झेंडावंदनाचा कार्यक्रम केल्या जात आहे. येथील पिंपळाच्या झाडाला क्रांतीकारी बाबुराव शेडमाके यांना इंग्रजांनी फाशी दिली हेाती ते हे पवित्र स्थळ आहे. या स्मारकाचा विकास करणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी पुर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रजासत्ताक दिन हा दे शातला मोठा उत्सव आहे. संपूर्ण देशात हा उत्सव साजरा करण्यात येत असून देशातील व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील हंसराज अहीर यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …