*सकाळच्या सुमारास आगीचे तांडवाने हादरले सावनेर*
*मुलमुले मेंन्शन मधे आग*
*बँक आँफ बडोदा जळून खाक*
*बँकेचे अतोनात नुकसान*
*एलआयसी ला कीरकोळ झड़*
*सुदैवाने जिवंत हानी नाही*
*समाजसेवी,पोलिस प्रशासन व अग्निशमन विभागाच्या संयुक्त प्रयत्नानी आगेवर मीळवीले नियंत्रण*
*मोठी दुर्दैवी घटना टळली*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत स्थानिक प्रतिनिधी सुरज सेलकर*
सावनेर *मिळालेल्या माहिती नुसार आज सकाळी 6-00च्या दरम्यान नागपूर रोड वरील भालेराव हायस्कूल च्या समोर असलेल्या मुलमुले मेन्शन या इमारतीत असलेल्या बँक आँफ बडोदा मधे अचानक आग लागुन सायरन चा आवाज ऐकू आला घरमालक जयंत मुलमुले व त्यांचे छोटे भाऊ धनंजय मुलमुले यांनी खाली येऊन बघितले असता बँक आँफ बडोदा च्या कँबीन मधे आग लागल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आपल्या परीने आग विझविण्याचे तसेच इमारतीत असलेले बँक,एलआयसी कार्यालय व्यवस्थापक सोबतच स्थानिक पोलीस प्रशासन व नगर पालिकेच्या अग्निशमन विभागास सुचना दील्या अश्यात आगीने रौद्र रुप धारण करुन संपूर्ण बँकेस आपल्या विठीत घेतले वेळीच सावनेर पो.स्टे.चे निरिक्षक अशोक कोळी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले नगर सेवक निलेश पटे,माजी नगर उपाध्यक्ष विजय बसवार यांनी सावनेर,खापा,खापरखेडा येथून अग्निशमन बंब बोलावून जवळपास दिड् तासाच्या परिश्रमातून आगेवर नियंत्रण मीळवीण्यात आले तोवर बँक आँफ बडोदा ही पुर्ण पणे जळून कोळसा झाली*
*एल आय सी कार्यालय थोडक्यात बचावले*
*बँक आँफ बडोदा ला शार्ट सर्कीट मुळे लागलेल्या आगीने रौद्र रुप घेतल्याने बँक आँफ बडोदा च्या थेट वर असलेल्या एलआयसी कार्यालयापर्यंत आगीचे झपाटे पोहचू लागले व सदर कार्यालय ही आता जळुन राख रांगोळी तर होणार नाही अशी भीती प्रत्यक्षदर्शीत होऊ लागली परंतू घटनेची माहिती शाखा व्यवस्थापनास मिळताच शाखा व्यवस्थापन,कर्मचारी व स्थानिक एलआयसी एजेंन्ट यांनी घटनास्थळी धाव घेऊण कार्यलय उघडून कार्यालयात असलेल्या अग्निशमन उपकरणांनी आगेवर नियंत्रण मिळविले तरी काही प्रमाणात एलआयसी कार्यालयाचे कागदपत्रे, फाईल, संगणक सोबत काही प्रमाणात फर्नीचर बाधित झाल्याचे सोबतच आगीच्या धुराने व अग्निशमन बंबाच्या फवारणी च्या पाण्याने बाहेरील काचे फुटल्याने कार्यालयातील आतील भाग व कागदपत्रे ओले झाल्याची माहीती शाखा व्यवस्थापकानी दिली*
*तर मुलमुले मेंन्शन जळून खाक झाले असते*
*सकाळी सहाच्या दरम्यान लागलेली आग ही जर दोन तीन तास आधी लगली असती तर खाली वर राहणारे घर मालक व शेजारी साखर झोपेत असते व अश्यात बँक आँफ बडोदा सोबतच वरील माळ्यावर असलेले एलआयसी कार्यालयास अगीने आपल्या विठीस घेतले असते तर संपूर्ण मुलमुले मेन्शन ही इमारत सोबत त्यात राहणारे जयंत मुलमुले यांचा संपूर्ण परिवाराच्या जिवीतेचा प्रश्न नीर्माण झाला असता असे प्रत्यक्षदर्शी अँड् मनोज खंगारे यांनी सांगितले व सदर घटनेत कोणतीही जिवंत हानी न झाल्यामुळे संपूर्ण प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला*
*नगर पालिकेचा अग्निशमन शमन बंब उशिरा पोहचल्याचा आरोप*
*घटनेची सुचना वेळीच मिळून सुद्धा नगर पालिका सावनेर चा अग्नीशमन बंब जवळपास तास भर उशिरा पोहचल्याचा आरोप होत असुन सदर अग्निशमन बंब आपल्या क्षमतेनुसार कार्य करत नसल्याचे ही बोँलल्या जात असल्याने उपस्थित गर्दीतुन नगर प्रशासनाच्या अग्निशमन विभाग व अग्निशमन बंबाच्या देखरेखीवर नागरिकांतुन रोष व्यक्त करण्यात आला तर विश्वस्त सुत्रा व्दारे मिळात असलेल्या माहिती नुसार आधी तर अग्निशमन वाहन सुरुच होत नव्होते त्याचे कारण त्यात डीझल नसल्याचे ही दबक्या आवाजात बोलल्या जात असुन वाहणाची बँटरी ही काम करत नसल्याने सदर वाहनास काही लोकांच्या मदतीने धक्का मारुन सुरु करण्यात आल्याची माहिती उघडकीस येत असल्याने नगर वासीयात तीव्र संताप आहे*
*अश्या अप्रिय आकस्मिक घटनेस तोंड देण्याकरीता अग्निशमन विभाग व वाहन चोवीस तास सज्ज असने गरजेचे असते परंतू नगर वासीयांच्या सेवेत असलेले अग्निशमन वाहन व त्यावर कार्यरत असणारे अकुशल कर्मचारी असा सावळागोंधळ अश्याच प्रकारे सुरु असल्यास नगरविसीयांच्या मालमत्ता व जीवीतेचा “देवच…मालक” असल्याचे बोलल्या जात आहे*
*आकस्मिक लागलेल्या सदर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी समाजसेवी व नगरसेवक निलेश पटे,माजी नगर उपाध्यक्ष विजय बसवार,माजी नगर सेवक व भाजप नेते,रामराव मोवाडे,माजी नगरसेवक तेजसिंग सावजी,नगरसेवक तुषार उमाटे,सोनु नाईक,अमित झोडापे,सोनु नवधिंगे,न.प.कर्मचारी पंकज छेनीया,अनिल गोवर्धन,लाला समुद्रे,सावनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक अशोक कोळी,पीएसआय सागर कारंडे,हे.का.विजयसिंग पांडे,सुधीर यादगीरे,प्रकाश ढोके व इतर कर्मचारी तर एलआयसी सावनेर शाखेचे व्यवस्थापक युवराज हातझाडे,शैलेश तोताडे,विजय वाघमारे,पारेश्वर निंबाळकर,अर्जुन गोखले,दिपक निखाडे,धवल डुंमरे,सतीश श्रीवास्तव,संजय जवाहर,चंदू बालपांडे,सोनल बागडे,धनराज निकोसे,अतुल कुलकर्णी, चेतन बिसेन,संजय लिखार,भरत लोधी,भुपेन्द्र वंजारी सह अनेक नागरिकांनी परिश्रम घेतले हे विशेष*