जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात
विशेष प्रतिनिधि -तुषार कुंजेकर
खात – परिसरामध्ये सतत दोन ते तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे धानगंजी व गहू शेतमालाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमानात संकटात पडला आहे.
अचानक पडत असलेल्या पावसामुळे शेतातील मालाची मळणी करणे शेतकऱ्याला अवघड होत असल्याचे दिसुन येत आहे, अचानक पडलेल्या पावसामुळे धनाच्या गंजीमध्ये पाणी शिरले तर दुसरीकडे गहू, चना, तुळ, लाखोरी, कापूस अशा अनेक शेतमालाचे नुकसान झाले असुन शेतमालाला भाव मिळेल किंवा नाही अशा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे.
धानाच्या गंजीमध्ये पाणी शिरल्याने धानाची मळणी कशी करावी कही शेतकऱ्यानि मळणी केलेली धान बाजारपेठेत नेले असता भाव मिळत नसल्याचे बोलले जात आहे भाव मिळाला नाही तर पिकाची परतफेड कशी करावी बहुतांश शेतकऱ्याच्या गंजी मध्ये पाणी शिरल्याने धाणाची मळणी कशी करावी पाउस कधी पडेल याचा नेम नाही, तर काही शेतकऱ्याचे गहू लोटल्याने जमीन दोष होत आहे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असुन नुकसाणीचा योग्य सर्वेक्षण करून मोबदला द्यावा अशी परिसरातील शेतकऱ्याची मागणी होत आहे.