सस्नेह जय जिजाऊ, जय ओबीसी, जय संविधान
ओबीसी जनगणना जागृती मोहीम
विशेष प्रतिनिधि- गौतम धोटे
चंद्रपूर:-कुणबी समाज मंडळ, चंद्रपूर द्वारा, चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे आयोजित शेतकरी मेळावा (शेतकरी महोत्सव 2020) 8 व 9 फेब्रुवारी 2020 पासून चालू आहे. 6 नंबर स्टॉलला भेट देऊन ओबीसी जनगणनेसाठी सहकार्य करावे ही विनंती.या वेळी उपस्थितांना करण्यात आली
या मेळाव्यात मराठा सेवा संघ, शाखा राजुरा द्वारा ओबीसी जनगणना जागृती मोहीम स्टॉल नंबर 6 वरती राबविण्यात येत आहे.
पोस्ट कार्ड गृह मंत्रालयाला पाठविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. जनगणना झाली तर काय होईल तसेच मंडल आयोगाच्या शिफारशी लिहिलेले पत्रके तसेच जनगणना 2021 मध्ये ओबीसीचा कॉलम नाही म्हणून आमचा जनगणनेत सहभाग नाही अशा आशयाच्या पाट्या वाटप करण्यात येत आहे.
पहिल्या दिवशी आमच्या स्टॉलला विद्यमान खासदार बाळूभाऊ धानोरकर, माजी खासदार हंसराज अहिर, अविनाश जाधव, गोविंदा पोडे, अनिल डहाके, बळीराज धोटे, दिनेश चोखारे, डॉ. राकेश गावतुरे, डॉ. विश्वास झाडे, ॲड. सातपुते, पप्पु देशमुख, उमाकांत धांडे, सचिन राजूरकर, सूर्या अडबाले, सुधाकर खरवडे, विजय मुसळे, मनीषा चटप, दिपाली हिंगाने, बापू धोटे, मंगल बल्की, बंडू डाखरे, रमेश ताजने, महादेव ढुमणे, विनोद सोनटक्के व प्रबोधन विचार मंचची टीम, छोटू सोमलकर, संतोष देरकर, विघ्नोज राजूरकर, भूमिपुत्र टीम, श्रीकांत पोडे, मनोज मालेकर इत्यादी प्रतिष्ठित लोकांनी भेटी दिल्या.
*पहिल्या दिवशी एक हजार पोस्ट कार्ड भरण्यात आले. एक हजार सह्या घेण्यात आल्या तसेच एक हजार पत्रके वाटण्यात आली.*
या मोहिमेसाठी दिनेश पारखी, लक्ष्मण तुराणकर, विवेक खुटेमाटे, उत्पल गोरे, लक्ष्मण घुगुल, मधुकर डांगे, विनोद बोबडे, संभाजी साळवे, अनिल डहाके, विजय मोरे, बाबुराव मुसळे यांनी पुढाकार घेतला