हिंगणघाट जळीतकांड; पीडितेचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार
वर्धा जिल्ह्यातील पालकमंत्री सुनिल केदार हे सुध्दा नागपुर चे शवविच्छेदन गृहाजवळ पोहोचले आहेत. पीडितेच्या नातेवाईकांची समजूत काढण्याचा ते प्रयत्न करीत आहेत
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेचा मृतदेह शवचिकित्सेसाठी नागपूर मेडीकल कॉलेजमध्ये नेण्यात आला.
नागपूर : विशेष प्रतिनिधी
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडितेच्या वडिलांना फोनवरून दिलेले आश्वासन लेखी द्यावे, अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनाी केली आहे. लेखी आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेच्या नातेवाईकांनी घेतला आहे.
हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित शिक्षिकेने घेतला अखेरचा श्वास
मेडीकल कॉलेजमध्ये पीडितेच्या नातेवाईकांनाी एकच गर्दी केली आहे.
हिंगणघाट जळीतकांड; ‘त्या’ नराधमाला फाशी द्या, पीडितेच्या आईने फोडला हंबरडा
हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील पीडित शिक्षिकेच्या परिवारातील एका सदस्याला नोकरी आणि जलदगती न्यायालयात हा खटला चालविण्याचे आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडितेच्या वडिलांना सोमवारी दिले. या आश्वासनानंतर पीडितेच्या नातेवाईकांनाी मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी दर्शविली होती. मुलीला जाळणाऱ्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या किंवा त्यालाही तसेच जाळा अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनाी केली होती. मागणी पुर्ण होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा पीडितेच्या नातेवाईकांनाी घेतला होता. मात्र अनिल देशमुख यांच्या आश्वासनानंतर अखेर पीडितेच्या नातेवाईकांनाी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र आता नातेवाईकांनाी लेखी आश्वासनांची मागणी केली आहे.
हिंगणघाट जळीतकांड : आरोपीलाही जिवंत जाळण्याची पीडितेच्या वडिलांची मागणी