*आणी प्राणज्योत मावळली*
*अश्या घटनांन वर आळा घालण्याकरिता आँध्र प्रदेश सरकार सारखे पाऊल ऊचलने गरजेचे*
*मुख्य संपादक*
*संपूर्ण महाराष्ट्रा सह देशाला हादरुन सोडणारे वार्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील शिक्षीकेचे जळीत प्रकरण आज सकाळी त्या पीडितेनी घेतलेल्या शेवटच्या श्वासाने सर्व काही हेलावून नेले*
*आज सकाळच्या दरम्यान पीडीतेची प्राणज्योत मावळली व अनेक प्रश्नांना जन्म देऊण गेली,कीती अजुन कीती निर्भयांचा बळी…? व आरोपींना कीतपत संरक्षण यावर जितके बोलावे व लिहावे ते कमीच त्याचे उदाहरण म्हणजे निर्भया केस मधील आरोपींना फाशुच्या शिक्षा होऊण ही तारीख पे तारीख…*
*हिंगणघाट जळीत प्रकरणात तसे तर होणार नाही ना…? महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री व मंत्री महोदयांनी सुध्दा याप्रकरणी पुढे येऊण आरोपीला कठोर शिक्षा होणार व त्याकरीता आम्ही वचनबद्ध आहोत.व वेळ पडल्यास कठोर कायदे ही बनवून लवकरात लवकर आरोपीला शिक्षा होईल असे सहवेदनापर मनोगत व्यक्त केले आहे.*
आज एक वडील म्हणून मन अतिशय खिन्न झाले. हिंगणघाट येथील पीड़ित लेकीची मृत्युशी झुंज आज अखेर संपली. गेले सात दिवस तिने दखविलेल्या धैर्याचा आज अंत झाला. विकृत मानसिकतेला बळी पडलेल्या लेकीला न्याय हा मिळणारच. तिच्या गेल्या सात दिवसापासूनच्या झुंजीला परमेश्वर शांती प्रदान करो. लेकीच्या संपूर्ण कुटुंबासोबत नेहमीच न्याय भावनेने खंबीरपणे उभा राहील. अश्या नराधम वृत्तीला समूळ पणे नष्ट करण्याकरीता व्यापक व कडक उपाययोजनांची अंमलबजावणी तात्काळ करू व त्या माझ्या लेकीला न्याय मिळवून देण्याकरिता कटिबद्ध राहील. मृत आत्म्याला शांती लाभो व तिच्या कुटुंबातील सदस्यांना दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान हो परमेश्वर चरणी प्रार्थना.
*सुनील केदार*
*पशुसंवर्धन दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य*
आज अंत्यत दुर्दैवी घटना घडली तिला वाचवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पण ती वाचू शकली नाही,आई वडिलांची भावना समजू शकतो, निश्चितच तिला न्याय मिळेल त्यासाठी सरकार त्या दिशेने कारवाई करत आहे कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहे,महिला बालकल्याण राज्यमंत्री म्हणून यासाठी घटना रोखण्यासाठी काही पाऊले उचलले जातील यासाठी नवीन काही कायदे आणता येईल त्या दिशेने कारवाई होईल अशी प्रतिक्रिया हिंगणघाट येथील पीडित युवतीच्या मृत्यूनंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
बच्चू कडू
(राज्यमंत्री)
माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय..
हिंगणघाट येथील महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला, आपण या ‘हिंसक-पुरुषी’ मानसिकतेशी संघर्ष सुरू करूया.तिला न्याय मिळवून देण्यासाठी शासन ठोस पाऊले उचलत आहेच तिच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोतच.आरोपीला कठोर शिक्षा होऊल यासाठी शासन कटिबद्ध आहे.अशी प्रतिक्रिया मंत्री यशोमति ठाकुर यांनी दिली
यशोमती ठाकूर
महिला व बालकल्याण मंत्री
*हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशी ची शीक्षा व्हावी अशी तीव्र मागणी आता जोर धरु लागली आहे त्याकरीता महाराष्ट्र शासनाने वेळ न गमावता कठोर कायदा तयार करुण आध्र प्रदेश शासना सारखा आथवा त्यपेक्षाही कठोर व जलद गतीने न्याय मिळवून देणारा कायदा तयार करुण पीडीस खरी श्रध्दांजली वाहून यापुढे महाराष्ट्र अश्या घटनांना स्वरूप देण्याआधी ओरोपी शंभर वेळा विचार करेल असा कठोर कायदा तयार करावा*
*पिडित परिवाराच्या या दुखात संपूर्ण महाराष्ट्र न्यूज मीडिया सहभागी असुन महाराष्ट्राच्या लडली ला परम पीता परमेश्वर चिर शांती प्रदान करो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना*
*किशोर ढुंढेले*
*मुख्य संपादक महाराष्ट्र न्यूज मीडिया*