Breaking News

गडचांदूरच्या काँग्रेस नेत्यांना खासदारांचा विसर उलटसुलट चर्चांना उधाण/समर्थकात नाराजीचा सूर

गडचांदूरच्या काँग्रेस नेत्यांना खासदारांचा विसर

उलटसुलट चर्चांना उधाण/समर्थकात नाराजीचा सूर

कोरपना प्रतिनिधि -गौतम धोटे 
चंद्रपूर जिल्ह्यातील सिमेंट उद्मोग म्हणून ओळख निर्माण असलेल्या या कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूर नगरपरिषदेतील काँग्रेसचे माजी नगरसेवक,गटनेता पापय्या पोन्नमवार यांचा १० जानेवरी रोजी वाढदिवस होता.यानिमित्याने एका वृत्तपत्रात जाहीरात देण्यात आली.विशेष म्हणजे सदर जाहिरात मध्ये काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी,राहूल गांधी,चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार,राजूरा विधानसभा क्षेत्राचे नवनियुक्त आमदार सुभाष धोटे,राजूरा न.प.चे नगराध्यक्ष अरूण धोटे नेतेस्थानी होते तर खाली गडचांदूर नगरपरिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्षा व नगरसेवक यांचे फोटो दिसत आहे.मात्र क्षेत्रात नावाजलेले,सर्वांचे लाडके नेते तथा महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांना सदर जाहीरातीत कोणतेही स्थान देण्यात आले नसल्याचे पहायला मिळत आहे.मागील लोकसभा निवडणूक अक्षरशः अटीतटीची ठरली होती मात्र या निवडणुकीत महाराष्ट्रातून निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव खासदारला गडचांदूरातील नेत्यांनी अशाप्रकारे डावलने म्हणजे याला चूक म्हणावी की जाणूनबुजून केलेले कृत्य ही बाब पचणी पडत नाही.याविषयी जनतेत अनेक शंकाकुशंकांना कमालीचे पेव फुटले असून सदर जाहीरातमुळे खासदार धानोरकर यांच्या समर्थकात मोठ्याप्रमाणात नाराजीचे सूर उमटताना दिसत आहे.नुकतीच गडचांदूर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक पार पाडली.यावेळी खासदार धानोरकर यांच्या एका नातेवाईकाला येथील नेत्यांनी तिकीट नाकारले होते.यानंतर देखील खासदार धानोरकरांनी याठिकाणी येऊन प्रचार सभा घेतल्या.असे असतानाही आता पुन्हा येथील नेत्यांनी खासदाराला डावलने ही बाब आश्चर्यकारक ठरत आहे.यासंबंधी शहरात उलटसुलट चर्चांना उधाण अल्याचे चित्र असून यामुळे मात्र खासदार समर्थक प्रचंट नाराज दिसत आहे.हाप्रकार गटबाजीचा तर नाही ना अशी शंका व्यक्त करत याप्रकरणी अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …