Breaking News

*डॉ.बबनराव तायवाडे यांचा वाढदिवस उत्‍साहात साजरा*

*डॉ.बबनराव तायवाडे यांचा वाढदिवस उत्‍साहात साजरा*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

कोराडीदलित,गोरगरीब,शेतकरी,शेतमजूर यांच्‍या मूलांच्‍या शिक्षणासाठी झटणारे आणि ओ.बी.सी. समाजाच्‍या हितासाठी लढणारे डॉ.बबनराव भाऊरावजी तायवाडे ,अध्‍यक्ष,श्री सच्‍चिदानंद शिक्षण संस्‍था नागपूर,यांचा वाढदिवस तायवाडे महाविद्‍यालयाच्या प्राध्‍यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्री क्षेत्र गणपती देवस्‍थान आदासा येथे राज्‍यस्‍थरीय राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या शिबीरात मोठ्‍या उत्‍साहात साजरा केला गेला.या कार्यक्रमाच्या अध्‍यक्षस्‍थानी तायवाडे महाविद्‍यालयाच्‍या प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे या होत्‍या. तर प्रमुख अतिथी म्‍हणून मा.सुभाषजी बेलसरे,माजी कुलसचिव व समन्‍वयक राष्‍ट्रीय सेवा योजना राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्‍यापीठ नागपूर व मा.मनोहरराव बुटे,माजी प्राचार्य,संताजी महाविद्‍यालय नागपूर व डॉ.रामकृष्‍ण टाले बॅ.शेषराव वानखडे महाविद्‍यालय खापरखेडा हे होते. श्री.सुभाषजी बेलसरे व श्री मनोहरराव बुटे या दोघांनीही बबनरावांच्‍या जीवनावर प्रकाश टाकला व हलाखीच्‍या परिस्‍थितीवर मात करत आज नागपूर विद्‍यापीठात शैक्षणिक क्षेत्रात एक महत्‍वपुर्ण व्‍यक्‍तिमत्‍व व ओ.बी.सी.समाजाच्‍या हितासाठी लढणारा व्‍यक्‍ती कसा तयार झाला हे या शिबीरातील विद्‍यार्थ्‍यासमोर आपले विचार व्‍यक्‍त केले.या कार्यक्रमाला आदासा गावातील व परिसरातील सन्‍मानिय लोंकाची उपस्‍थिती तसेच तायवाडे महाविद्‍यालयातील व बॅ.शेषराव वानखडे महाविद्‍यालयातील सर्व प्राध्‍यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि तसेच शिबीरातील सर्व विद्‍यार्थी उपस्‍थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …