Breaking News

विसापूर मातोश्री वृद्धाश्रमात धान्य वाटप. ह्यूमॅनिटेरियल मल्टीपरपज फाऊंडेशनचा उपक्रम.

विसापूर मातोश्री वृद्धाश्रमात धान्य वाटप.

ह्यूमॅनिटेरियल मल्टीपरपज फाऊंडेशनचा उपक्रम.

कोरपना प्रतिनिधि -गौतम धोटे

कोरपना:- आयुष्यातील अंतिम टप्प्यात आलेल्या निराधार महिला,पुरुषांना अत्यंत सुरक्षित व आपला वाटणारा विसापूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे सामाजिक उत्तरदायित्व मानणाऱ्या “ह्यूमॅनिटेरियन मल्टिपरपज फाऊंडेशन” या सामाजिक संस्थेतर्फे नुकतेच निराधारांना धान्याचे वितरण करण्यात आले.अख्खे आयुष्य समाज आणि स्वतःच्या कुटुंबासाठी घालून सुद्धा आता निराधारपणाचे भोग नशिबी आलेल्या वृद्धांना मदत व्हावी या उदात्त हेतूने एका कार्यक्रमाच्या माध्यमातून सदर उपक्रम राबविण्यात आला होता.अध्यक्षस्थानी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुजाता करमणकर तर सचिव सूरज करमणकर, सोपान खामनकर,अमित करमनकर,सुभाष तेलंग, आर्यन लोणारे,सुमित्रा तेलंग, नीना फुलझेले यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.सर्व अतिथींच्या हस्ते निराधार वृद्धांना धान्य वाटप करण्यात आले.याप्रसंगी येथील निराधार वृद्ध,पुरुष व महिलांना मनोगत व्यक्त करताना गहिवरून आले होते.“या वयात जो आनंद नातवंडांच्या सहवासात मिळतो तो कुठेच मिळत नाही” असे सांगत पूर्वआयुष्यात रंगून गेल्याचे आढळून आले.आभार फाऊंडेशन अध्यक्षा सुजाता करमणकर यांनी केले तर प्रीती करमणकर,अश्विनी लोणारे,यश उमरे,सुदत्त वाघमारे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …