Breaking News

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर भीषण अपघात – ४ मृत १२ जखमी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर भीषण अपघात
४ मृत १२ जखमी

विशेष प्रतिनिधि

मौदा : स्थानिय पोलिस स्टेशन च्या हद्दीतील सिंगोरी शिवारात आज सकाळी 5:15 वाजता झालेल्या ट्रॅव्हल्स व कंटेंनर मध्ये झालेल्या अपघातात ४ प्रवाशी मरण पावले तर १२ प्रवाशी गंभीर जखमी झाले. जखमींवर भंडारा व नागपूर येथिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वरुण झिलपे रा. माणेवाडा नागपूर यांचे कुटुंबातील लग्न समारंभ भंडारा येथे असल्याने त्यांचे नातेवाईक ट्रॅव्हल्स ने भंडारा येथे गेले होते.लग्न समारंभ आटोपून वऱ्हाडी नागपूर ला परतत असताना सिंगोरी फाट्याजवळ हा अपघात घडला.

ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच ३५ सी क्यू ८५४८ च्या चालकाला झोपेची गुंगी आल्याने त्याचे वाहणावरील नियंत्रण सुटले व वाहन पुढच्या कंटेनर क्रमांक एम एच ४९ ए टी ३८५५ वर धडकले. ही धडक इतकी भीषण होती की यात ४ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला लागला. मृतांमध्ये विठाबाई तुकाराम झिलपे (७२ वर्ष), करुणा विजय खोंडे (५८), आनंद रमेश आठवले (२८) सर्व रा. नागपूर व सतीश जांभुलकर (३५) रा गोंदिया यांचा समावेश आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …