सावनेर शहरातील वार्ड क्र.17 पहलेपार येथे नागपूर मेडिकल काँलेज च्या नँशनल एड्स कंट्रोल आँर्गनायझेशन (नँको) या पथकाच्या महिला डॉक्टरांवर झालेल्या एँसीड् हल्ला चे दुर्दैवी घटनांवर काही समाजसेवी महिलांनी महाराष्ट्र न्यूज मीडिया ला आपल्या प्रतिक्रिया दिल्या…*

13 फेब्रुवारीला सावनेर शहरातील वार्ड क्र.17 पहलेपार येथे नागपूर मेडिकल काँलेज च्या नँशनल एड्स कंट्रोल आँर्गनायझेशन (नँको) या पथकाच्या महिला डॉक्टरांवर झालेल्या एँसीड् रुपी द्रव्याच्या हल्ल्यात एक महिला डॉक्टर सोबतच दोन स्थानिक महिला बाधित झाल्या होत्या.नुकत्याच घडलेल्या हिंगणघाट जळीत प्रकरणामुळे सदर घटनेचे गांभीर्य वाढून समाजमन सुन्न झाले होते.सदर द्रव्य ज्वलनशिल नसल्यामुळे पीडितांना जास्त त्रास सहन करावा लागला नाही परंतू सातत्याने घटत असल्या या दुर्दैवी घटनांवर काही समाजसेवी महिलांनी महाराष्ट्र न्यूज मीडिया ला आपल्या प्रतिक्रिया दिल्या…*

*जिवीत जाळने,एँसीड् फेक,स्त्री अत्याचार, अतीप्रसंग,सामुहीक अतीप्रसंग,चिमुकल्यांवर अत्याचार अश्या घटना सभ्य समाजाकरिता घातक ठरत असुन अश्या घटनांचा कायमचा पायबंद होणे व त्याकरीता कठोरतम कायदा अस्तित्वात येऊण कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता वाटेल ती उपाययोजना आखूण समाजात कार्य करणार्या आई बहिणींचे संरक्षण व्हावे व अश्या दुर्दैवी घटनांचा मी तिव्र शब्दात निषेध नोंदवून अश्या नराधामांना तात्काळ कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करते*


*ज्योती ताई सीरसकर*
जिल्हा परिषद सदस्य वाकोडी क्षेत्र नागपूर

*आई जिजाऊ ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आदर्श लाभलेल्या महाराष्ट्रात सातत्याने घटणार्या अप्रिय घटना खरोखरच मानवतेला काळीमा फासणार्या नराधामांचा कायमचा बंदोबस्त व अप्रीय व समाजास हेलावून टाकणार्या दुर्दैवी घटनांवर आळा बसविण्या करिता कठोर कायदे निर्माण होण्याकरितासर्व महिला पुरुष संघटनांनी एकत्र येऊण कठोर कायदे निर्मिती करिता शासनास बाध्य करण्याकरिता आंदोलनात्मक पाऊल उचलण्याची वेळा आली असुन कठोर कायदे व कठोर निर्णय जोवर घेतल्या जणार नाही व कायद्यांची भीती जोपर्यंत जनसामान्यात रुजनार नाही तोपर्यत आश्या घटना थांबणार नाहीत*
*हिंगणघाट व सावनेर सारख्या घटनांची पुणरावु्त्ती भविष्यात होऊ नये याकरिता शासनाने तात्काळ उपाययोजना आखावी*


*सौ.सुषमा लक्ष्मीकांत दिवटे*
*नगरसेविका नगर पालिका सावनेर*

*समाजाचे मुख्य आधार स्तंभच जर सुरक्षित राहणार नाही तर समाज उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणी अश्या दुर्दैवी घटनांन मुळे समाजात भितीचे वातावरण निर्माण राहून महिलांना अबला समजून त्यांचा छळ करणार्यांवर जोवर कठोर दंडात्मक कारवाया कयणारे कठोर कायदे जलदगती व आवश्यकता भासल्यास अतीजलदगती न्यायालयांची स्थापना होऊण समाज,गुंडप्रवु्त्ती व शहरासह संपूर्ण देशाच्या आंतरिक कायदा व सुव्यवस्था सांभाळणार्या पोलीस प्रशासनास अधिक अधिकार व स्वातंत्र देऊण अश्या विक्षिप्त मानसिकतेवर आळा बसविने आजचे प्रथम उद्देश असावे*


*किशोरी विजय बसवार*
*माजी नगरसेविका न.प.सावनेर*

*नागपूर मेडिकल च्या नँशनल एड्स कंन्ट्रोल आँर्गनायझेशन (नँको) च्या पथकावर झालेल्या एँसीड् हल्याचे फक्त नोंदवून चालणार नाही तर अश्या सार्वजनिक योजनांवर कार्य करणार्या पथकास शासनाने सुरक्षा पुरवावी व “बेटी बचाओ,बेटी पढाओ” या मोहिमेतून महिलांना आत्मरक्षणा करिता जुडो,कराटे,लाठी काठी व आवश्यकता भासल्यास शस्त्र चालवीचे प्रशिक्षण शालेय स्तरावरुन देऊन महिला सबळीकरणा कडे पाऊल उचलावे*

*डॉ. जोत्सना धोटे*
*स्त्री रोगतज्ञ तनुश्री नर्सींग होम सावनेर*

*हिंगणघाट व सावनेर येथे सुशिक्षित अश्या प्राध्यापीका व डाँक्टर चमुवर प्राणघातक हल्ला कळमेश्वर तालुक्यातील निरागस चिमुकलीचे प्रकरणानी महिला सुरक्षे चे दावे फोल ठरत आहे*
*महिला कुठे सुरक्षित आहे विश्वास बसत नौकरी,व्यवसाय, शैक्षणिक कार्य सोबतच इतर कार्यास घरून बाहेर पडणार्या महिलां विशेषताः मुली जोपर्यंत सुखरुप घरी परत येत नाही तोपर्यंत भीतीचे वातावरण प्रत्येक पालक वर्गात असतेच याऊपर सातत्याने घटत असलेल्या ठेचून मारणे, पेट्रोल टाकून जाळणे,एँसीड हल्ले सारख्या प्रकारांवर आळा घालण्याकरिता अश्या नराधामांना तात्काळ जन्मठेप,फाशी सारख्या शिक्षा मीळाव्या*

*लता ढवळे*
*सावनेर तालुका योग विस्तारक*

*सावनेर शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा प्रदान करण्याकरिता आलेल्या पथकावर झालेला एसीड हल्ला हा विकु्त मानसिकतेतून जरी झाला असला तरी त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडून परत एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.एकीकडे शासन म्हणतो “बेटी बचाओ बेटी पढाओ” आणि प्राध्यापक, डाँक्टर ,विद्यार्थींनी सोबतच छोट्या चिमुकल्यांवर असे जिवघेने हल्ले होतात याला कुठेतरी शासना सोबतच पारिवारिक संस्कार ही जबाबदार आहेत*
*अश्या घटनांवर आळा बसविन्या करिता कठोर कायद्याची नितांत आवश्यकता असुन सदर घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी*


*सौ.सीमा सुनील चाफेकर*
*समाजसेवीका सावनेर*

 

*समाजात कु्रतेचे प्रमाण वाढत असुन महिला कुठेही सुरक्षित दिसुन येत नाही दिवसा ढवळ्या मुलींना जाळण्याचे प्रयत्न होऊ लागले आहे,घरात घुसुन अतिप्रसंग व छेड काढणे,भर रस्त्यावर अपराधिक तत्वांचा वावर,अपराधिक तत्वांना पोलीस व कायद्याची भीती नसल्याचे दिसून येत आहे या सर्व गंभीर बाबींपासून महिला व समाजाला वाचवायचे असेल तर आरोपींने ज्याप्रमाणे अत्याचार केला आहे त्याच प्रकारची शिक्षा त्यास तात्काळ देऊण जश्यास तसे ऊत्तर देणारा कायदा निर्माण व्हावा तेव्हाच अपराधिक तत्वांमधे भितीचे वातावरण निर्माण होईल याचे उदाहरण द्यायचे झाले म्हणजे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी नी सुरु केलेला अपराधीक तत्वांवर मुसक्या आवरण्या करीता प्रयत्न त्यामुळे अनेक अपराध्यांनी शरणागती पतकरुण आत्मसमर्पन केले तर काहिंचा इनकाऊंटर.अश्याच कठोर निर्णयाची आज देशाला आवश्यकता आहे असे मला वाटते*

*सौ.नेहा पियुष झींजूवाडीया*

(जैन सखी मंच ग्रुप,सावनेर)

 

*वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीत प्रकरणाची शाई वाळत नाही तर सावनेर शहरात नँशनल एँड्स कंट्रोल आँर्गनायझेशन पथकावर एँसीड रुपी द्रव्याच्या हल्यात डॉ सोफी सायना व दोन स्थानिक महिलांना जरी जास्त दुखापत झाली नाही परंतू एका क्षणा करता मन स्तब्ध झाले होते. की काय मानसिकता आहे…?,कुठे आहे कायदा व सुव्यवस्था…?,अश्या दुर्दैवी घटनावर आळा कधी बसणार…?व मी,माझी मुलगी,माझी आई केव्हा सुरक्षित होणार…*
*या पश्नांची उत्तरे कधी तरी मीळणार की फक्त अश्या घटना घडल्या की सामाजिक संस्था हिरीमीरीने कँन्डल मार्च काढण्यास,निदर्शने करण्यास व निषेध नोदविंन्या पुर्तेच पुढाकार घेतील*


*सौ विद्या भोजराज सोनकुसरे*
(सामाजिक कार्यकर्ता)

*समाजात घडणार्या विकु्त घटना महिलांवर होणारे अतिप्रसंग आजच्या घडीला दिवसेंदिवस वाढतच आहे.महिलांवर शारीरिक, मानसिक छळ गु्ह कलेश सुध्दा वाढत आहे,माणूस एवढ्या खालच्या पातळीवर पोहचला आहे की त्याला स्वतःच्या मुलीची सुध्दा जाणीव त्याला राहली नाही.याला जबाबदार कोण…?*
*माझ्या मते शासन शासन जोपर्यंत कठोर होत नाही तोपर्यंत या विकु्ती वाढतच जाणार कारण गुन्हा घडल्यानंतर त्याला लगेच शिक्षा व्हायला पाहिजे त्यिला विलंब व दप्तर दिरंगाई होता कामा नये किंवा जनसामान्यामधे फाशीची शिक्षा सर्वसामान्य लोकांनपुढे अश्या नराधामास खुल्या मैदानात अथवा घटनास्थळी फासावर लटकवील्या गेले पाहीजे तेव्हाच अश्या विकु्त मानसीकतेवर आळा बसुन अश्या दुर्दैवी घटनांन मधे घट येईल*


*प्रा.सौ.संगीता शांताराम ढोके*

 

*सदर घटनेवर व आपल्या क्षेत्रातील जनसामान्य समस्यांनवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्या करिता मुख्य संपादक किशोर ढुंढेले,संपादक योगेश कोरडे महाराष्ट्र न्यूज मीडिया 9325243536 वर आपल्या प्रतिक्रिया आमंत्रित…🙏*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …