Breaking News

*”स्वरधारा”संगीतमय महोत्सव संपन्न* स्वर….मय झाली कै.राम गणेश गडकरी नाट्यगु्ह

*”स्वरधारा”संगीतमय महोत्सव संपन्न*

स्वर….मय झाली कै.राम गणेश गडकरी नाट्यगु्ह

सावनेर प्रतिनिधि- सूरज सेलकर

*सावनेरः स्थानिक “स्वरधारा” संगीत विद्यालयाचा वार्षीक महोत्सव सोहळा कै.राम गणेश गडकरी नाट्यगु्ह येथे थाटात संपन्न झाला*


*आयोजित समारोहाच्या अध्यक्ष स्थानी वरिष्ठ अधिवक्ते कु्ष्णरावजी मोवाडे तर प्रा.साहेबराव विरखरे,नगरसेवक निलेश पटे,मुख्याध्यापक पांडव सर,युवा समाजसेवी मनोज बसवार आदींच्या प्रमुख उपस्थितीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नू्त्य,गायन,वादन कलेचे आविष्कार सादर करुण उपस्थीत पाहुण्यां सोबतच प्रेक्षकांचे लक्ष वेधले*
*याप्रसंगी आपले विचार व्यक्त करित कार्यक्रमाचे अध्यक्ष कु्ष्णराव मोवाडे यांनी मानवी जिवनात संगीताचे महत्व यावर मार्गदर्शन करत स्वरधारा विद्यालयाचे शिक्षक कु्ष्णराव अटाळकर व त्यांच्या परिवारातील सदस्यांचे संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले तसेच आजच्या संगणक व मोबाईल युग व आपाधापीच्या जिवनात मानवी शरिराला होणारे त्रास व वाढणार्या ताणावापासुन दुर नेण्याकरिता संगीत साधने शिवाय दुसरा मार्ग नाही असे मोलाचे मार्गदर्शन केले*


*कार्यक्रमाचे विशेष आकर्षण तबला आलंकार आशिष अटाळकर यांचे मंत्रमुग्ध करणारे तबला वादन,स्मिता अटाळकर यांचे गायन तर ओम व संस्कार कांबळे यांची जुगलबंदी,वेदराज डोईफोडे यांचे गीत गायन तर ज्योती पारधी व रुचिका पारधी यांचे मनमोहक नु्त्य यानी उपस्थित रसिकांना संमोहित करण्याचे कार्य केले*
*तर कु.कोकीळा चौधरी,वैष्णवी सोनटक्के,नमन पवार,श्रध्दा नानवटकर,सुचिता मेश्राम,यथार्थ वरुडकर,विस्मया बोंदरे,वैशाली जाधव आदी कलावंतानी आप आपल्या प्रस्तुती प्रस्तुत करुण दाद मिळविली कार्यक्रमाची सुरुवात सौ.स्मिता अटाळकर व चमुंच्या सामुहीक गायनानी करण्यात आली*
*कार्यक्रमाची सांगता संगीत क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणारे आशिष अटाळकर व कळंबे बंधूंचे उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊण गौरव करण्यात आला.*
*कार्यक्रमाला दत्ता धोटे,प्रा.विलास डोईफोडे,सदानंद खळंबे,विनोद पारधी सह अनेक गणमान्य नागरिक पालक वर्गाने शेकडोच्या संखेत उपस्थित राहुन सदर आयोजनाचा मनमुराद आस्वाद घेतला*
*कार्यक्रमाचे संचालन देशपांडे व किशोर यांनी तर आभार अटाळकर यांनी मानले*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …