Breaking News

*वाकी फाटा बनला डेथ ट्रॅप* *लोखंडी दुभाजक लावल्यामुळे अपधाताचे प्रमाण कमी होईल*

*वाकी फाटा बनला डेथ ट्रॅप*

*लोखंडी दुभाजक लावल्यामुळे अपधाताचे प्रमाण कमी होईल*

*विशेष प्रतिनिधी अनंता पडाळ सोबत अक्षय चिकटे पाटनसावंगी*

*पाटणसावंगी- वाकी फाटा हा डेथ ट्रॅप बनलेला आहे काही महिन्यापासून सातत्याने हा अपघात पॉईंट बनलेला आहे इथे प्रत्येक आठवड्यात किरकोळ किंव्हा गंभीर प्रकारचे अपघाताची घटना घडत असतात.
या संदर्भात अनेक वर्तमान पत्रातून प्रखरतेने वाकी फाटा बनला डेथ ट्रॅप या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.त्याच वृत्ताची दखल घेत पोलीस साहाय्य निरीक्षक निशांत फुलेकर यांनी महामार्गाच्या कार्यालयामध्ये हा मुद्दा मांडला व वाकी फाटा ला लोखंडी दुभाजक तयार करण्यात आले आहे
८ जानेवारी ला उमेन्द्र श्यामराव बंड रा.पाटणसावंगी, वय ९२ हे सकाळी ७ वाजता mh-४० d ६४२१ दुचाकी वाहनाने शेतामध्ये जात असताना नागपूर वरून सावनेर कडे भरधाव येणाऱ्या चारचाकी mh-४९ ae ६३९८ या वाहनाने वाकी फाट्याजवळ धडक दिल्याने उमेन्द्र बंड यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.
लोखंडी दुभाजक तयार झाल्याने अपघाताचे प्रमाण कमी होईल वाहनचालकांना आता वाकी कडे जाण्यायाकरिता ओव्हरब्रिज खालून जावे लागनार. फाट्याजवळून ४०० मीटर अंतरावर ओव्हरब्रिज आहेत.
ओव्हर ब्रिज खालून वाहन येतील तर अपघात होऊ शकतात हा ओव्हर ब्रिज चुकीचा आहेत व वळण घेत असताना चालकांना दोन्ही बाजूच काही दिसत नाही ९० डिग्री वळण घ्यावं लागतात असे सावनेर चे पोलीस सहाय्यक निरिक्षक निशांत फुलेकर यांनी माहिती दिली.

वाकी फाट्याजवळ ओव्हर ब्रिज ची गरज आहे असे स्थनिक नागरिकांची मागणी आहेत
*पोलीस सहय्यक निरिक्षक निशांत फुलेकर यांनी सदर स्थानावर होत असलेल्या नेहमीच्या अपघाता विषयी महामार्गच्या कार्यालयात सदर मुद्दा मांडून त्या ठिकाणी लोखंडी दुभाजक लावल्यास वाढत्या अपघातावर नियंत्रण मिळवीण्याचे प्रयत्न होऊ शकल्याची बाब महामार्ग कार्यालयास पटली व सदर ठिकाणी लोखंडी दुभाजक बसविण्याचे कार्य सुरु झाले.आपल्या कर्तव्य दक्षतेचा परिचय देणारे पोलीस सहाय्यक निरिक्षक निशांत फुलेकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे हे विशेष*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …