Breaking News

*सावनेरात ढोल ताश्यांच्या गजरात शिव जयंती उत्साहात साजरी…* *दांडपट्टा,पटा,तलवारबाजी चे प्रात्याक्षित…*

*ढोल ताश्यांच्या गजरात शिव जयंती उत्साहात साजरी…*

 

*दांडपट्टा,पटा,तलवारबाजी चे प्रात्याक्षित…*

*मिरवनुकीत उसळली तरुणाई…*

 

*सावनेर मित्र परिवाराचे भव्य आयोजन*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सह प्रतिनिधी सुरज सेलकर*

*सावनेरः हिंदवी राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शहरातील तरुणाई सकाळ पासुनच भगवे फेटे व माथ्यावर भाल टीळा लावून हातात व आप आपल्या मोटर साईकल व वहानांनवर भगवा ध्वज लावून “जय भवानी जय शिवाजी”चा जयघोष करत जयस्तंभ बाजार चौक येथे गोळा होऊ लागले…*
*सुमारे 11-00 च्या दरम्यान मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली ढोल ताश्यांच्या गजरात सोबतच दिंडी व वहानावर छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती व चलचित्रे लावून सजावट केलेल्या वाहानांच्या लांब रांगांचा काफीला हळुहळु पुढे सरकु लागला व छिंदवाडा रोड वरिल छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरोही पुतळ्यावर सर्व तरुणाईची अलोट गर्दी उसळुन आप-आपल्या मानवंदना वाहु लागली तर युवकांनी काठी,पटा,तलवार आदीचे प्रात्याक्षीत करुण उपस्थितांचे मनोरंजन करत लोप पावत असलेल्या “दाड़पट्टा “या आत्म सुरक्षेच्या साधनांची ओळख पटवून देत आजच्या काळाला याची गरज आहे असा संदेश दीला…*
*आयोजनाच्या यशस्वीते करीता पांडुरंग भोंगाडे,दिनेश इंगोले,अभय पगारे,सागर खंगारे,विजय कुहिटे,मंधार मंगळे,अभिषेक गहरवार, आदींनी परिश्रम घेतले…*
*सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तेजसिंग सावजी,कार्यध्यक्ष किशीर ढुंढेले,माजी नगर सेवक लक्ष्मीकांत दिवटे,नगर सेवक निलेश पटे सह नगरीचे मान्यवरांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुण शिवरायांना मानवंदना दील्या…*

*शिव जयंती निमित्ताने शहरातील तरुणाई उत्साहात रस्त्यावर उतरणार व भव्य मिरवणूकि मुळे वहातुक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार तसेच मिरवणूकि दरम्यान मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सावनेर पो.स्टे.चे पोलीस निरिक्षक आशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक अधिकारी अशोक आठवले तसेच पोलीस अधिकारी यांच्या व्दारे चोख बंदोबस्त ठेऊण उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …