Breaking News

*सावनेरात शिव जयंती निमित्त चित्रकला व भाषण स्पर्धा*

*शिव जयंती निमित्त चित्रकला व भाषण स्पर्धा*

सावनेर प्रतिनिधि – सूरज सेलकर

*सावनेरः नगरीतील न.प.अभ्यंकर प्राथमिक शाळेत आज दिनांक १९/०२/२०२० ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाषण स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली.यात विजयी विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे लोकप्रतिनिधी श्री.तुषार उमाटे सर पालक सदस्य कयाम शेख मुख्याध्यापिका सौ अनिता गणेश झाडे जेष्ठ शिक्षक श्री.नरेन्द्र चापरे,श्री.सुरेश गजभे,श्री.माणिक रामटेके आणि जेष्ठ शिक्षिका सौ.सुनंदा राऊत या उपस्थित होते.*
*शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना थोर राष्ट्र पुरुषांचे पराक्रम, त्याग व त्यांनी केलेल्या भरिव कार्याची जान असावी याकरिता चित्रकला व भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यात अनेक विद्यार्थी विद्यार्थींनींने सहभाग नोंदवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनीवर भाषण करुण आपल्या कौशल्याचा परिचय दिला*
*याप्रसंगी नगरसेवक तुषार उमाटे यांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले.सुटीचा दिवस असुनही विद्यार्थ्यानीं दाखवलेला उत्साह आणि त्यांनी दिलेल्या भाषणांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे संचालन श्री.चापरे सर यांनी तर आभारप्रदर्शन श्री.रामटेके सर यांनी केले.*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …