Breaking News

*हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीचा जेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न*

*हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीचा जेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न*

*विशेष प्रतिनिधी नागपूर*

*हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याने कारागृहात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. आरोपीने कारागृहातच गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.*
*20 फेब्रुवारी ला आरोपीची न्यायालयात सुनावणी होणार असल्याची महाती आहे.*

*आरोपी विकेशने 17 फेब्रुवारीला रात्री ब्लँकेटच्या सहाय्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सध्या विकेश नागपूरच्या अंडासेलमध्ये आहे. विकेशची न्यायालयीन कोठडी संपणार असून व्हिडीओ कॉन्फरन्सने विकेशला न्यायालयात उद्या हजर करणार असल्याची माहिती मिळत आहे.*

*नुकतेच काही दिवसांपूर्वी आरोपी विकेशने 24 वर्षीय शिक्षिकेवर पेट्रोल टाकून तिला जाळले होते. यामध्ये ती 30 टक्क्याच्या वर भाजली होती. पण उपचारादरम्यान शिक्षिकेचा मृत्यू झला.*

*काय आहे हिंगणघाट जळीतकांड प्रकरण?*

*24 वर्षीय शिक्षिका दररोज सकाळी आपल्या कर्तव्यावर जात असताना आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे तिचा पाठलाग करायचा. सोमवार 3 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवायला जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत होता. हिंगणघाट शहरातील एका चौकात येताच सकाळी 7.15 वाजताच्या सुमारास आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती अंदाजे 30 टक्के भाजली होती. तिचा चेहरा जळाल्यामुळे तिच्यावर अनेक शस्त्रक्रियाही करण्यात आल्या होत्या परंतू तज्ञ डॉक्टरांना ही तीला वाचविण्यात यश आले नसल्याने तीचा दुर्दैवी मु्त्यू झाला होता*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …