Breaking News

*यमराज्याच्या सासुरवाडीत उसळली भाविकांची अलोट गर्दी…*

 

*यमराज्याच्या सासुरवाडीत उसळली भाविकांची अलोट गर्दी…*

*सकाळ पासून बम बम भोले- ओम नमः शिवाय चा गुंज…*

*शिव महापुराण चे भव्य आयोजन*

*भागवत,रामायण,महाभिषेक,महाप्रसाद आदींचे आयोजन…*

*पौराणिक हेमांड पंथी शिव मंदिरात भव्य आयोजन…*

सावनेर प्रतिनिधि- सूरज सेलकर सोबत कैमरा पर्सन दिनेश चौरासिय

सावनेर *जैमिनि अश्वमेघे ,, या पौराणिक ग्रंथाच्या आधारे यमराज्याची सासुरवाडी सावनेर म्हणजे स्वारस्वतपुर ऐतिहासिक व पौराणिक नगरी आहे द्वापर युगात महाभारता नंतर पंडवानी अश्वमेघ यज्ञ केला दिग्विजयसाठी त्यांनी सोडलेले श्यामकर्ण घोड़ा उत्तर भारत पदाक्रांत करित दक्षिणकडील दंडकरन्यात शिरला व आद्रिक “श्री क्षेत्र आदासा”नगरी ओलांडून तो सरस्वतपुरच्या पुर्ण वेशिवर लालबागेत येथून धडकला सरस्वतपुरच्या तात्कालीन महापराक्रमी विरवर्मा नामक राजांच्या पांच मुलांनी घोड़ा अडविला युद्धतात पाचही राजपुत्र विरगतीस प्राप्त झाले. विरवर्माची कन्या मालिनी ही शंकरची परभक्त होती तिने युद्ध नेटने सुरुच ठेवले मालिनीचे स्वहस्ते एक वळूची शिवपिंड तयार करुण तपश्चयर्च बळाने कोलार नदिचा प्रवाहः वळविला मालिनीची तपश्चर्या पाहुन भगवान श्री कृष्ण येथे आले आणि युद्ध थंबविले व नारद मुनीच्या मध्यस्थाने यमराज शी मालिनीचे लग्न लाऊन दिले आज ही शिव मंदिरा कड़े कोलार च्या वळलेला परवाह दिसतो हेमांन्द्री करगिरानी त्या पिंडी वर चुन्याचा वापर न करता सुंदर कोरिव दगडचे एक शिवालय बांधले हेच आजचे शिव मंदिर होय*

*सदर पौराणिक शिव मंदीर हे11-12 व या शतकातील असुन हेमांडपंथी बांधनीचे असुन अगदी साधी व कमी कलाकुसरीचा अवलंब करुण बांधलेले मंदीर आहे.असे असले तरी सदर मंदिर भव्य दीव्य असुन ऐतिहासिक महत्व या हेमांडपंथी मंदिरांस प्राप्त आहे.*

*16 व्या शतकात औरंगजेबच्या सैन्यांनी आदासा येथील गणेश मंदीर व सदर शिव मंदिराची तोडफोड करुण सदर मंदिर व परिसरात असलेल्या मुर्तांना बर्याच पैकी नुकसान पोहचवत नामशेष करण्याचा प्रयत्न केला होता हे विशेष…*

*स्थापन शिव मंदिर हे कोलार नदीच्या तीरावर असुन पश्चिममुखी आहे गर्भगु्ह,अंतराळ व सभामंडप अश्या त्री अंगाची रचना आहे मंदिरातील गर्भगु्हात एकच देवकोष्ट असुन यात गणेश प्रतिमा आहे गर्भगु्हाचा आकार अंदाजे 4 × 4 मीटर ईतका असुन प्रवेशव्दार नक्षीयुक्त असुन सभा मंडपात भव्य नंदीची मुर्ती व सभा मंडपातील स्तंभ नक्षीयुक्त आहे सदर शिव मंदीरात असलेली वाळूची पिंड ही तपस्विनी मालिनी ने तयार केलेली असुन ईतक्या दशका नंतर ही भाविकांना आपल्याकडे आकर्षित करते..*

*महाशिवरात्रीच्या निमित्ताने परमपुज्य श्री.श्री.1008 महामंडलेश्वर “यशोदानंदजी महाराज” सर्वभौम सनातन धर्म महासभा (प.अजय पुरोहित) सीहोर मध्य प्रदेश यांच्या मुखवाणीतून शिव महापुराणाचे आयोजन करण्यात इले असुन भाविक मंडळी याचा आस्वाद घेत आहेत*
*सोबतच ह.भ.प.श्री नितेश महाराज वाटकर (खैरी ढालगाव),ह.भ.प.लीलाधर महाराज घागरे (पांढुर्णा),ह.भ.प.प्रकाश महाराज (सौसर),ह.भ.प.हरिदास महाराज कनिरे (मोवाड),ह.भ.प.मंगेश महाराज चटप (मोगरा),ह.भ.प.लखन महाराज भादे (पांढुर्णा) आदींच्या प्रमुख उपस्थितीत हरिपाठ,पुरान पालखी,शोभायात्रा,नगर भ्रमन,दहीकाला किर्तन आदिंच्या आयोजनानी संपूर्ण परिसर भक्तीमय झालेले आहे*
*शिवमंदिर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने महाभिषेक,आरती,रामायण पाठ,भजन,भागवत,प्रवचन व महाप्रसादाचे भव्य आयोजन दरवर्षी केल्या जात असुन संपूर्ण नगरवासी सदर आयोजनात सहभागी होऊण उत्सव भव्य प्रमाणात साजरा करतात…*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …