Breaking News

मोवाड येथे महाशिवरात्री उत्साहात साजरी 

 मोवाड येथे महाशिवरात्री उत्साहात साजरी 


मोवाड प्रतिनिधि -श्रीकांत मालधुरे

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा जुनी व्यसती मोवाड जाग्रतेशर महादेव मंदिर येथे मोवाड वासी गावकरी जनता यांच्या सहकार्य ने मोठ्या उत्साहात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. याउत्सवा मध्ये सकाळी महादेवाचे मंदिरात आरती झाली .त्यानंतर सकाळी ९वाजता पासून विठ्ठल मंदिर येथुन डोढल पथक ,बेलोना मोवाड याचे व महिला भंजन मंडळ खैरगाव,मोवाड,गणेशपुर, वडाउमरी,बेलोना व इतर पुरुष मंडळाने सुद्धा सहभागी होते मोवाड शहरातुन चौकाचौकात साबुदाणा,चहा,बासुंदी, शरबत,व पाण्याची विशेष व्यवस्था गावाती भाविकांनी भंजनी मंडळासाठी करण्यात आली. तसे दुपारी २ वाजता डोल पथक,भंजनी मंडळ याचा आगमन जुनी वस्ती महादेव मंदिर झाले येथे सर्वाना मनपान रोख रक्कम देण्यात आली.व भाविकान साठी महादेव मंदिर कडून साबुदाणा व ताक मठेयचे वितरण करण्यात आले तसेच पोलीस ग्रफ यांच्या कडून सर्व शिव भाविकांना चहाचे वितरण करण्यात आले या महाशिवरात्री उत्सवात मोवाड .गणेशपुर,बेलोना,गोधनी,खैरगाव येथील हजारो शिवभक्तांनाचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …