*नगर प्रशासन व तालुका क्रिडा विभागाच्या आडमुठ धोरणाच्या विरोधात क्रीडा प्रेमी उतरणार रस्त्यावर*

*नगर प्रशासन व तालुका क्रीडा अधिकार्यांच्या आपसी सामंजस्या आभावी पाच कोटीचा निधी परत जाण्याच्या मार्गावर*

*क्रीडा संकुलातील 60-40 चा फार्मुला बनला आडसर*

*क्रीडा प्रेमी व खेळाडूचे भव्य निषेध रैलीचे आयोजन*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत विजय तिडके सावनेर*
*सावनेरः सावनेर शहरातील नगर प्रशासनाच्या मालकी हक्काचे नगर परिषद हायस्कूल चे एकमेव भव्य पटांगण असुन सदर पटांगणावर क्रिकेट, फुटबाँल,हाँकी,व्हाँलीबाँल,कबड्डी,खो,खो,दौड़ स्पर्धा,पतंग स्फर्धा,विट्टी दांडू सारख्या खेळाच्या खेळाडूंनी एकेकाळी संपूर्ण पटांगण गजबजून रहायचे तर सदर पटांगणावर शहरातील सर्व शाळा,काँलेज सोबतच नगर परिषद हायस्कूल चे विद्यार्थी शालेश स्पर्धेंचा सराव करत तर शासकीय ध्वजारोहण तसेच नगर वासीयांच्या मनोरंजनाकरिता सर्कस,मीना बाजार सारख्या आयोजनाकरिता सदर पटांगणाचा वापर होत होत असे.सदर पटांगणावर सततचे होत असलेल्या भव्य आयोजन बघता क्षेत्राचे तत्कालीन आमदार ,माजी मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख यांनी सदर पटांगणाच्या काही भागावर स्टेडियम बांधकाम करुण सदर पटांगाणावर भव्यता आणण्याचे प्रयत्न केले होते*
*सण 2003 मधे नगर प्रशासने पटांगणाचा काही भाग तालुका क्रीडा विभागास “विना मुल्य”हस्तातंरीत केला होता त्या हस्तारंतरीत केलेल्या जागेवर जिल्हा क्रीडा विभागाच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा विभागाव्दारे मोठे इनडोअर स्टेडियम तसेच स्केटींग ट्रँक बांधन्यात आले सदर जागा तालुका क्रीडा विभागास कमी पडू लागल्याने सदर पटांगणावर क्रीडा संकुल निर्माण करण्याकरिता उर्वरित जागेची मागणी केली असता नगर प्रशासनाने सदर क्रीडा संकुलात बाधन्यात येणारे 60 टक्के व्यवसायीक गाळे नगर प्रशासनास व 40 टक्के गाळे तालुका क्रीडा विभाग असा आपसी समझौत्यची मागणी केली असता दि.20 मार्च 2017 च्या पत्रानुसार क्रीडा विभागाने नगर प्रशासनाची मागणी मान्य करुण पटांगणाच्या विकासाचा आराखडा तयार करून क्रीडामंत्रालय महाराष्ट्र शासन येथे सादर केला*
*सदर नीधी परत जात असल्याची माहिती नगरीतील क्रीडाप्रेमींना कळताच वरिष्ठ खेळाडू व युवा समाजसेवी मनोज बसवार व प्रयास टीमच्या माध्यमातून सावनेर शहरातील सर्व क्रीडा प्रेमी,क्रीडा संस्था,सामाजिक संस्था व उदयमान खेळाडू दि.24 फेब्रुवारीला 2020 रोज सोमवार ला भव्य निषेध मोर्च्याचे आयोजन करण्यात आले असुन सदर विकास निधी परत जाऊ नये तसेच तालुका क्रीडा अधिकारी व नगर प्रशासन सावनेर यांच्यात समेट घडवून आणण्या करीता मुख्याधिकारी नगर परिषद सावनेर व उपविभागीय आधिकारी सावनेर यांना निवेदनातून मागणी करण्यात येणार आहे.*
*माधुरी गुरनूले,स्वाती गुरनुले सारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडू देणार्या पटांगणावरुण परत शहरातील उदयमान खेळाडू नीर्माण होण्याकरिता त्यांना हक्काचे पटांगण मिळावे करीता दि.24 फेब्रुवारीला सकाळी 10-30 राम गणेश गडकरी सभागृह कळमेश्वर रोड येथे सर्व खेळाडू व क्रीडा प्रेमींनी जास्तीत जास्त संखेत उपस्थित रहावे अशी विनंती मनोज बसवार व आयोजनात सहभागी सर्व क्रीडा संस्थांनी केली आहे*
Maharashtra News Media सच की आवाज