*नगर प्रशासन व तालुका क्रिडा विभागाच्या आडमुठ धोरणाच्या विरोधात क्रीडा प्रेमी उतरले रस्त्यावर*

*नगर प्रशासन व तालुका क्रीडा अधिकार्यांच्या आपसी सामंजस्या आभावी पाच कोटीचा निधी परत जाण्याच्या मार्गावर*

*क्रीडा संकुलातील 60-40 चा फार्मुला बनला आडसर*

*क्रीडा प्रेमी व खेळाडूचे भव्य निषेध रैलीचे आयोजन*

*खेळाडूंनी गांधी पुतळा चौकात क्रिकेट, व्हाँलीबाँल खेळून नोंदवीला निषेध*
*प्रतिनिधी सुरज सेलकर सोबत दिनेश चौरसीया सावनेर*
*सावनेरः सावनेर शहरातील नगर प्रशासनाच्या मालकी हक्काचे नगर परिषद हायस्कूल चे एकमेव भव्य पटांगण असुन सदर पटांगणावर क्रिकेट, फुटबाँल,हाँकी,व्हाँलीबाँल,कबड्डी,खो,खो,दौड़ स्पर्धा,पतंग स्फर्धा,विट्टी दांडू सारख्या खेळाच्या खेळाडूंनी एकेकाळी संपूर्ण पटांगण गजबजून रहायचे तर सदर पटांगणावर शहरातील सर्व शाळा,काँलेज सोबतच नगर परिषद हायस्कूल चे विद्यार्थी शालेश स्पर्धेंचा सराव करत तर शासकीय ध्वजारोहण तसेच नगर वासीयांच्या मनोरंजनाकरिता सर्कस,मीना बाजार सारख्या आयोजनाकरिता सदर पटांगणाचा वापर होत होत असे.सदर पटांगणावर सततचे होत असलेल्या भव्य आयोजन बघता क्षेत्राचे तत्कालीन आमदार ,माजी मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख यांनी सदर पटांगणाच्या काही भागावर स्टेडियम बांधकाम करुण सदर पटांगाणावर भव्यता आणण्याचे प्रयत्न केले होते*

*सण 2003 मधे नगर प्रशासने पटांगणाचा काही भाग तालुका क्रीडा विभागास “विना मुल्य”हस्तातंरीत केली होती त्या हस्तारंतरीत केलेल्या जागेवर जिल्हा क्रीडा विभागाच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा विभागाव्दारे मोठे इनडोअर स्टेडियम तसेच स्केटींग ट्रँक बांधन्यात आले सदर जागा तालुका क्रीडा विभागास कमी पडू लागल्याने सदर पटांगणावर क्रीडा संकुल निर्माण करण्याकरिता उर्वरित जागेची मागणी केली असता नगर प्रशासनाने सदर क्रीडा संकुलात बाधन्यात येणारे 60 टक्के व्यवसायीक गाळे नगर प्रशासनास व 40 टक्के गाळे तालुका क्रीडा विभाग असा आपसी समझौत्याची मागणी केली असता दि.20 मार्च 2017 च्या पत्रानुसार क्रीडा विभागाने नगर प्रशासनाची मागणी मान्य करुण पटांगणाच्या विकासाचा आराखडा तयार करून क्रीडामंत्रालय महाराष्ट्र शासन येथे सादर केला*

*त्या अनुशंगाने क्षेत्राचे आमदार व दुग्ध विकास, पशु संवर्धन,क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सदर विषयाचा पाठपुरावा करत जवळपास चार कोटी रुपयांचा विकास निधी खेचून आणत क्षेत्रातील क्रीडा पटांगणाचा विकास व होतकरू खेळाडूचे निर्माण व्हावे करिता परिश्रम घेतले.अश्यात तालुका क्रीडा विभाग व नगर प्रशासन सावनेर यात क्रीडा संकुलातील निर्माणाधीन गाळ्याचे 60/40 या वाटाघाटी वरुण वादास सुरुवात झाली व मान्य झालेल्या निधी तसाच पडून राहीला*

*नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले व त्यात क्षेत्राचे आमदार सुनील बाबू केदार यांना दुग्ध विकास,पशू संवर्धन मंत्रालया सोबतच क्रीडा व युवा कल्याण मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आसता त्यांनी सदर प्रकरणात जातीने लक्ष घालून आधीच्या चार कोटीच्या प्राप्त निधीत एक कोटीची भर टाकत अनुदानीत रक्कम पाच कोटी करत सावनेर करांना दिलेल्या वचनाची पुर्तता करत वचनबध्दता निभवली परंतू नगर प्रशासन व तालुका क्रीडा विभागात क्रीडा संकुलातील 60-40 गाळे वाटपात आडमुठ धोरणास सुरुत होऊण सदर विकास निधीचा उपयोग होण्यापुर्वीच तीढा़ निर्माण झाला व सदर नीधी आता परत जाण्याच्या मार्गवर आहे*

*सदर नीधी परत जात असल्याची माहिती नगरीतील क्रीडाप्रेमींना कळताच वरिष्ठ खेळाडू व युवा समाजसेवी मनोज बसवार व प्रयास टीमच्या माध्यमातून सावनेर शहरातील सर्व क्रीडा प्रेमी,क्रीडा संस्था,सामाजिक संस्था व उदयमान खेळाडू दि.24 फेब्रुवारीला 2020 रोज सोमवार ला भव्य निषेध मोर्च्याचे आयोजन करण्यात आले असुन नगर परिषदेचे मुख्याधिकारी रविन्द्र भेलावी यांच्याशी सदर विषयावर चर्चा करुण निवेदन देत गांधी पुतळा येथे जवळपास अर्धा तास क्रिकेट व व्हालीबाँल खेळून आपला रोष प्रस्तुत करत सदर विकास निधी परत जाऊ नये तसेच तालुका क्रीडा अधिकारी व नगर प्रशासन सावनेर यांच्यात समेट घडवून आणण्या करीता मुख्याधिकारी नगर परिषद सावनेर व उपविभागीय आधिकारी अतुल म्हेत्रे सावनेर यांना निवेदनातून मागणी करण्यात आली.*


*माधुरी गुरनूले,स्वाती गुरनुले सारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडू देणार्या पटांगणावरुण परत शहरातील उदयमान खेळाडू नीर्माण होण्याकरिता त्यांना हक्काचे पटांगण मिळावे करीता दि.24 फेब्रुवारीला सकाळी 10-30 राम गणेश गडकरी सभागृह कळमेश्वर रोड येथुन आयोजीत भव्य निषेध रैलीत शेकडो खेळाडू व क्रीडा प्रेमी सोबतच सर्व क्रीडा संस्थांचे खेळाडू व पदाधिकारी शामील होते*

*याप्रसंगी मान्यवरांनी आपले मत व्यक्त करित म्हटले की गावाच्या विकासात आपसी राजकारण आणून गावातील उदयमान खेळ प्रतिभांचे अहित होणार नाही यावर सत्ताधारी पक्षाने विचार करावा अन्यथा शहरातील क्रीडा प्रेमींना तीव्र आंदोलनात्मक पाऊल उचलन्यास बाध्य व्हावे लागेल असा ईशारा याप्रसंगी देण्यात आला*

*संतप्त क्रीडा प्रेमींचे निवेदन स्वीकारुन त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे प्रयत्न केल्या जाईल अशी कबुली मुख्याधिकारी रविंन्द्र भेलावी यांनी दिली तर निषेध रैली दरम्यान चौकातील वाहतूक व्यवस्था काही काळ प्रभावित झाली असुन पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही तर नगर परिषद सावनेर चे सत्ताधारी पक्षाचे कोणतेही पदाधिकारी उपस्थीत नसल्यामुळे त्याचे मनोगत कळू शकले नाही विशेष…*

*निषेध मोर्च्याचे नेतृत्व प्रयास टिमचे मनोज बसवार,युवक काँग्रेस चे सावनेर विधानसभा अध्यक्ष राजेश खंगारे,विरोधी गट नेते सुनील चाफेकर,नगरसेवक निलेश पटे,दिपक बसवार,माजी नगर सेवक लक्ष्मीकांत दिवटे,डोमासाव सावजी,शैलैष जैन,रामभाऊ उमाटे,गोपाल घटे,श्याम धोटे,क्रीडा प्रेमी चंदु कामदार,अजय डाखोळे,बिल्लू अकोने,योगेश पाटील, सचिन अकोने,रमेश घटे,पंकज बले,विजय तीडके मनोज बघारे आदिंनी केले तर प्रयास टी,ड्रीम क्रिकेट क्लब सावनेर,सावनेर तालुका तायकांडो असोशियेशन,समीर एलेव्हन,राँयल वाँरीयर्स,विश्वरत्न क्रिकेट क्लब,कँप कोबरा क्रिकेट क्लब,नागपूर नीधी क्रिकेट क्लब,गजानन स्पर्धा परिक्षा क्लासेस,सावनेर सुपर किंग,एनसीसी नाईट रायडर,फ्रेंन्डस् बँडमिंटन क्लब सावनेर,भवन्स पँरेन्टस् गु्प,लोकशक्ती स्पोर्टींग कल्चर गु्प,यंग बाँईज सटवा माता मंदिर परिसर गु्प,अष्टविनायक क्रिकेट क्लब,सावनेर स्ट्रायकर्स,आयकाँन स्केटिंग अकँडमी,मिनर्वा एलेवन,सराफा एलेवन आदी क्रीडा संस्थांचे उदयमान खेळाडूंन सोबतच महिला (मुलीं) शेकडोच्या संखेत उपस्थित राहुन आपला निषेध नोदवीला*
Maharashtra News Media सच की आवाज