Breaking News

*भारतीय जनता पार्टी चे राज्यव्यापी आंदोलन* *चंद्रशेखर बावनकुळे माजी उर्जा व पालकमंत्री करणार नेतृत्व*

*भारतीय जनता पार्टी चे राज्यव्यापी आंदोलन*

*चंद्रशेखर बावनकुळे माजी उर्जा व पालकमंत्री करणार नेतृत्व*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत सुरज सेलकर सावनेर*


*आंदोलनात हजारो च्या संखेत सहभागी होण्याचे शहर भाजप अध्यक्ष मंदार मंगळे चे आव्हान*

*सावनेरः भारतीय जनता पार्टी व्दारे चालवीण्यात येत असलेल्या राज्यव्यापी धरणे आंदोलनाच्या अनुशंगाने भारतीय जनता पार्टी सावनेर तालुका च्या वतीने दि.25 फेब्रुवारी 2020 ला सकाळी गांधी चौक सावनेर येथे विविध मागण्या करिता भव्य धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून उपविभागीय अधिकारी सावनेर यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात येणार आहे*
*महाविकास आघाडी सरकार ने सत्तेत येण्यापुर्वी जी आशवासने जनतेला दिली होती ती न पळता जनतेची निव्वळ दिशाभूल करुण फसगत केलेल्या आश्वासनाच्या मुद्यावर राज्य शासनाला सदर राज्यव्यापी धरणे आंदोलनातून जाब विचारल्या जाणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे*
*यात शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी करुण सातबारा कोरा करणे,शेतकर्यांना25000/- रू.प्रति हेक्टर नुकसान भरपाई त्वरित देणे,महिला अत्याचार,अन्याय व सुरक्षा व्यवस्था कायद्या बाबत ठोस पाऊल उचलने,सुशिक्षित बेरोजगारांना काम देऊण राज्यातील बेरोजगारी दुर करणे,नगर परिषद व ग्राम पंचायत निवडणूकीत नगराध्यक्ष व सरपंच थेट जनतेतून पुर्ववत निवड व्हावी,जिल्हा वार्षिक नियोजन ग्रामीण विकास निधी 750 कोटी वरुण 550 कोटी करण्यात आला ती निधी वाढवून पुर्ववत करण्यात यावी,मागीलसरकारच्या काळात विकास कामाचा निधी मंजूर करण्यात त्या विकासाच्या कामाचा निधीला स्थगीती देण्यात आली आहे ती सर्व विकास कामे त्वरित सुरू करावी,केन्द्र सरकारने लागू केलेला CAA व NCR कायद्याला पाठींबा द्यावा,मागील सरकार ने पाच वर्ष कोणत्याही शेतकऱ्यांचे विद्यूत कनेक्शन कापले नाही आता शेतकऱ्यांना विद्यूत बील आकारणी होत आहे ती रद्द करावे.इत्यादी मागण्या सदर घरणे आंदोलनातून करण्यात येणार असल्याची माहिती भाजप शहर अध्यक्ष मंदार मंगळे यांनी दिली*

*सदर आंदोलनाचे माजी उर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे करणार असुन नागपूर जिल्हा भाजप अध्यक्ष अरविंद गजभिये,माजी जिल्हाध्यक्ष डॉ राजीव पोतदार,वरिष्ठ भाजप नेते दादाराव मंगळे,अशोक धोटे,रमेश मानकर (माजी जी.प.अध्यक्ष),अँड् प्रकाश टेकाडे,नितीन राठी,सोनबा मुसळे,देवीदास मदनकर,रमेश जैन,अरुण सिंग,रामराव मोवाडे,अशोक तांदुळकर,सौ.रेखाताई मोवाडे (नगराध्यक्ष न.प.सावनेर),सौ.प्रियंका मोहटे (नगराध्यक्षा न.प.खापा)आदींच्या प्रमुख उपस्थितीत सदर राज्यव्यापी धरणे आंदोलन आयोजीत करण्यात आले आसुन या आंदोलनात सावनेर तालुक्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी हजारो च्या संखेने उपस्थीतरहावे अशी विनंती भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष वीजय देशमुख व सावनेर शहर अध्यक्ष मंदार मंगळे यांनी केली आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …