Breaking News

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात दोन गावांत आधार प्रमाणीकरणास प्रारंभ

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात दोन गावांत आधार प्रमाणीकरणास प्रारंभ

गड़चिरोली प्रतिनिधी-सूरज कुकुड़कर

गडचिरोली: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील देसाईगंज व लखमापूर बोरी (ता.चामोर्शी) येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणीकरण करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिली यादी प्रसिध्द करण्यात आली. यानंतर लगेच गडचिरोली जिल्हयातील दोन गावांमध्ये पथदर्शी स्वरूपात यादी सार्वजनिक करून आधार प्रमाणीकरणास सुरूवात झाली. यावेळी जिल्हयातील पहिले आधार प्रमाणिकरण चामोर्शी तालुक्यातील सखुबाई लहूजी सातपुते यांचे झाले. त्यांनी यावेळी कर्ज स्वरूपातील रक्कम पडताळून ऑनलाईन सहमती दिली. दुसरे प्रमाणीकरण देसाईगंज येथील नंदू नरोटे यांचे करण्यात आले.

पथदर्शी स्वरूपात प्रसिद्ध झालेल्या दोन गावांमध्ये प्रथम यादीत २९१ लाभार्थींची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरीक सुविधा केंद्र किंवा गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत जावून करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी केले. उर्वरीत सर्व लाभार्थींची यादी २८ फेब्रुवारीपर्यंत प्रसिध्द केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे म्हणाले. जिल्ह्यातील १६ हजार २३८ थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास ८३.७५ कोटी रूपयांची कर्जमाफी होऊन हे शेतकरी कर्जमुक्त होतील, असे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी सांगितले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …