Breaking News

*सावनेर येथे भारतीय जनता पार्टी चे राज्यव्यापी आंदोलन*

*भारतीय जनता पार्टी चे राज्यव्यापी आंदोलन*

*तीन मुडी छाप राज्य शासनाने शेतकरी, बेरोजगार युवक युवती व राज्यातील जनतेला वार्यावर सोडण्याचे पाप केल्याचा आरोप*

*सत्ताधारी पक्षाचा घेतला खरपुस समाचार*

सावनेर प्रतिनिधि सूरज सेलकर सोबत दिनेश चौरासिया

*सावनेरः भारतीय जनता पार्टी व्दारे चालवीण्यात येत असलेल्या राज्यव्यापी धरणे आंदोलनाच्या अनुशंगाने भारतीय जनता पार्टी सावनेर तालुका च्या वतीने दि.25 फेब्रुवारी 2020 ला सकाळी गांधी चौक सावनेर येथे विविध मागण्या करिता भव्य धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून अतुल म्हेत्रे उपविभागीय अधिकारी सावनेर यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात येणार आहे*


*महाविकास आघाडी सरकार ने सत्तेत येण्यापुर्वी जी आशवासने जनतेला दिली होती ती न पळता जनतेची निव्वळ दिशाभूल करुण फसगत केलेल्या आश्वासनाच्या मुद्यावर राज्य शासनाला सदर राज्यव्यापी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले*


*यात शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी करुण सातबारा कोरा करणे,शेतकर्यांना25000/- रू.प्रति हेक्टर नुकसान भरपाई त्वरित देणे,महिला अत्याचार,अन्याय व सुरक्षा व्यवस्था कायद्या बाबत ठोस पाऊल उचलने,सुशिक्षित बेरोजगारांना काम देऊण राज्यातील बेरोजगारी दुर करणे,नगर परिषद व ग्राम पंचायत निवडणूकीत नगराध्यक्ष व सरपंच थेट जनतेतून पुर्ववत निवड व्हावी,जिल्हा वार्षिक नियोजन ग्रामीण विकास निधी 750 कोटी वरुण 550 कोटी करण्यात आला ती निधी वाढवून पुर्ववत करण्यात यावी,मागीलसरकारच्या काळात विकास कामाचा निधी मंजूर करण्यात त्या विकासाच्या कामाचा निधीला स्थगीती देण्यात आली आहे ती सर्व विकास कामे त्वरित सुरू करावी,केन्द्र सरकारने लागू केलेला CAA व NCR कायद्याला पाठींबा द्यावा,मागील सरकार ने पाच वर्ष कोणत्याही शेतकऱ्यांचे विद्यूत कनेक्शन कापले नाही आता शेतकऱ्यांना विद्यूत बील आकारणी होत आहे ती रद्द करावे.इत्यादी मागण्या सदर घरणे आंदोलनातून करण्यात आल्या*


*भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते दादाराव मंगळे यांच्या अध्यक्षतेत,नागपूर जिल्हा भाजप माजी जिल्हाध्यक्ष डॉ राजीव पोतदार,नितीन राठी,सोनबा मुसळे,सौ.रेखाताई मोवाडे (नगराध्यक्ष न.प.सावनेर),अँड् संजय टेकाडे,अँड् प्रकाश टेकाडे,नगरसेवक तुषार उमाटे,देवीदास मदनकर,किशोर मुसळे,नितीन राठी,अशोक तांदुळकर,ज्ञानेश्वर गुडधे,आशीष माटे,तीलक कमाले,रविन्द्र ठाकुर,शत्रूघन सावरकर,आदींच्या प्रमुख उपस्थितीत सदर राज्यव्यापी धरणे आंदोलनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी राज्यातील सत्ताधारी पक्षावर सडाळून टीका करत हे सरकार शेतकरी विरोधी आहे,ही सरकार बेरोजगार विरोधी आहे,हे सरकार शब्दाला न पाळनारी सरकार आहे अश्या आरोपांचा भडीमार वक्त्यांनी आपल्या संभाषणातून केला कार्यक्रमाचे संचालन रामराव मोवाडे यांनी तर आभार सावनेर शहर अध्यक्ष मंदार मंगळे यांनी केले*


*धरणास्थळी सामुहीक राष्ट्रगीत गायन करुण उपविभागीय अधिकारी यांना वरिल मागण्यांचे निवेदन देऊण कार्यक्रमाची सांघता कर्यात आली धरणे आंदोलनात तालुक्यातील शेकडो महिला पुरुषांनी सहभाग नोदवून आपला रोष व्यक्त केला*


*धरणे आंदोलन आयोजनाच्या यशस्वीते करिता नगरसेवक आशीष मानकर,अरविंद ताजने,भाजप चे युवा नेते सोनू नवधिंगे,अमित झोडापे,राजू घुगल,सचिन महतपुरे,दिवाकर नारेकर,लक्ष्मण कमाले,किशोर बुरडे,विकास लाड,पीयूष बुरडे,विलास कांबडी,मनबोधदास महंत,बंडू दुधे,लाला गांधी,मनीष चित्तेवान,अश्वीन माटे,आदींनी परिश्रम घेतले*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …