Breaking News

*कत्तल खाण्यात जाणार्या 11 गायींना जिवन दान* *पाटनसावंगी पोलीसींच्या सतर्कतेने वाचले गौवंशाचे प्राण* *वाहन चालक फरार*

*कत्तल खाण्यात जाणार्या 11 गायींना जिवन दान*


*पाटनसावंगी पोलीसींच्या सतर्कतेने वाचले गौवंशाचे प्राण*


*वाहन चालक फरार*

*प्रतिनिधी अक्षय चिकटे पाटनसावंगी*
*सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील पाटणसावंगी येथे एका पिकअप् वाहनातून कत्तलीसाठी अकरा गायी पाटणसावंगी पोलिसांनी पकडल्या. या प्रकरणात आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालक फरार झाला अज्ञात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.*

*पिकअप चारचाकी क्रमांक एमएच २९ एक्स ७०८१ सागर रेस्टॉरेंट पाटणसावंगी रोडच्या बाजूला मंगळवार ला सकाळ पासून उभी असलेली माहिती पाटणसावंगी स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली.पोलीस घटनास्थळी दुपारी ३.३० जाऊन पिकअप चारचाकी हे तारपत्री ने झाकून होती पोलिसांनी ताळपत्री काढून बघितले तर अकरा गाई दाटीवाटीने उभ्या असलेल्या निदर्शनात आढळूनआल्या तर त्यातील दोन गाईचा मृत्यू झाला.*
*खापा मार्गकडून कामठी मार्गे कत्तलीच्या इराद्याने पिकअप् गाडीतून जनावरांची वाहतूक केली जात असल्याचा संशय प्रत्यक्षदर्शीनी व्यक्त केले*
*सदर वाहनात चालकसह एक व्यक्ती होता अशी माहिती नागरिकांनी दिली पोलिसांनी अकरा गायींसह एक पिकअप गाडी असा अंदाजे आठ लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून अज्ञात वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच त्या गायांना कवठा गौशाळा,केळवद येथे नेण्यात आले पुढील तपास सावनेर पोलीस सहाय्यक निरीक्षक निशांत फुलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा जुनघरे व संदीप नागरे, तपास करीत आहेत.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …