Breaking News

गुमंथी येथील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मेट्रो राईड प्रवास

गुमंथी येथील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मेट्रो राईड प्रवास

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

नागपुररोटरी क्लब ऑफ नागपुर व्हिजन तर्फ मतिमंद दिव्य ज्योती मतिमंद मुला मुलींची विशेष शाळा संत सिताराम महाराज प्रौढ मतिमंदाची निवासी कर्मशाळा व पूनर्वसन केंद्र, गुंमथी येथील शाळा व कर्म शाळेतील विद्यार्थ्याकरिता मेट्रो राईड चे आयोजन करण्यात आले होते. सुभाष नगर ते बर्डी , बर्डी ते सुभाषनगर असा मेट्रो प्रवास विद्यार्थ्यांनी केला प्रथमच विद्यार्थ्यांनी मेट्रो प्रवासाच्या आनंद घेतला प्रवास दरम्यान दिसणाऱ्या उंच उंच इमारती निसर्गरम्य दृश्य तसेच अंबाझरी तलाव व आजूबाजूचा परिसर पाहून विद्यार्थ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले यांच्या सुखात सहभागी होणाऱ्या उपस्थित रोटरन्साची आनंद व्दिगुणीत झाला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाने त्यांचेही मन भारावून गेले यावेळी विद्यार्थ्यांना अल्पोहार, स्नॅक्स तसेच पझल्स गेम वितरित करण्यात आले यावेळी रोटरीचे दिनेश नायडू, कांचन नायडू , सौरभ कांगा, आकांक्षा अग्रवाल , निता अग्रवाल तसेच शाळेचे मुख्याध्यापक पिलेश्वर मोरे कर्म शाळेच्या व्यवस्थापकीय अधीक्षिका अंजली मोरे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …