अरविंद इंडो पब्लिक स्कूल सावनेर येथे आरोग्य तपासणी शिबीर

अरविंद इंडो पब्लिक स्कूल सावनेर येथे आरोग्य तपासणी शिबीर

सावनेर प्रतिनिधि- सूरज सेलकर
सावनेरअरविंद इंडो पब्लिक स्कूल(हेटी) सावनेर या ठिकाणी आरोग्य शिबीर दि.२६फेब्रुवारी२०२० ला आयोजित करण्यात आले. या शिबिरा अंतर्गत लता मंगेशकर हौस्पिटल नागपूर येथील डॉ. अनुप्रीता बडागे , डॉ. रमेश रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. ह्या शिबिरात विध्यार्थ्यांचे दंत तपासणी,डोळे तपासणी व सामान्य आरोग्य तपासणी करून त्यांना औषध उपचार देण्यात आले व विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक डॉ. रामकुमार शर्मा सर यांनी शाळेच्या वतीने संपूर्ण लता मंगेशकर हौस्पिटलातील डॉक्टरांचे आभार व्यक्त केले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …