Breaking News

मनमर्जीने विद्यूत पोल उभारले अनियमीत पोल उभारल्यामुळे भविष्यात उदभवू शकतो धोका

मनमर्जीने विद्यूत पोल उभारले
अनियमीत पोल उभारल्यामुळे भविष्यात उदभवू शकतो धोका

कोरपना प्रतिनिधि-  गौतम धोटे

यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील मौजा अडेगाव ते येडशी – येडशी ते मुकुटबन RCCPL कंपनी ची मेन लाईन लाईन टाकण्यात आली आहे..ते लाईन कंपनी मार्फत आहे की एम.इ.सि. बी मार्फत आहे..जी ही मेन लाईन येडशी ते मुकुटबन रस्त्यावर विद्यूत खांब उभे केलेले आहे..ते खांब ग्रामपंचायत ला न विचारता व कुठलीही ग्रामपंचायत ची शासकीय परवानगी न घेता हे संपूर्ण काम त्यांनी केलं आहे…त्या मुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनास व रहदारीस फार त्रास होत आहे.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या मुळे त्यांनी उभे केलेले विद्युत खांब रोड च्या बाजूला मिनिमम 20फूट दूर उभे करण्यात यायला पाहिजे होते.परंतु ते पोल 9फूट रोडच्या अंतरावर गाडले गेले आहे.जर भविष्यात एखादा अपघात झाला काही झालं तर सर्वस्वी जबाबदार कंपनी राहणार आणि हे जे उभे केलेले पोल 15 दिवसाच्या आत जर त्यांनी काढले गेले नाही तर समस्त येडशी ग्रामवाशी उपोषणाला बसेल …

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …