Breaking News

सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान दुल्हेशाहबाबाच्या उर्स ला सुरुवात

सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान दुल्हेशाहबाबाच्या उर्स ला सुरुवात

कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे

कोरपनातालुक्यातील प्रसिद्ध दर्गाह व श्रद्धास्थान असलेल्या कुसळ येथील दुल्हेशाह बाबा यांचा उर्स ला शुक्रवार पासून प्रारंभ झाला आहे. या उर्सला जिल्ह्यातील जनता या उर्सला हजेरी लावुन आपली मनते पुर्ण करण्यासाठी दर्ग्यावर नतमस्तक होतात. तिन दिवस चालणाऱ्या या उर्सला जत्रा ही भरते . विविध कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात येते. सर्वच जाती धर्माचे या ठिकाणी हजेरी लावत असतात या वर्षी दिनांक सहा तारखेला सुरु होणारा उर्स आठ तारखेला संपणार आहे. 

कौमी एकता समारोह या कार्यक्रमाचे अध्यक्ष बल्लारपूर चे आमदार व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे राहणार असुन उदघाटक चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळुभाऊ धानोरकर हे राहणार आहे तर विशेष अतिथी म्हणून राजुराचे आमदार सुभाष धोटे, चंद्रपूरचे
आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार संजय धोटे राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून चंदनसींग चंदेल,
वरोरा नगर अध्यक्ष अहेतेशाम अली, हरीष शर्मा, राजेंद्र वैद्य, गोदरु पाटील जुमनाके, विजयराव बावणे, सतीश धोटे, अरुण नवले, अँड शाकीर मलक, सोहेल भाई, मिनाज भाई, वसंता मडावी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.तर आठ तारखेला वसीम साबरी रेडीओ टिव्ही सिंगर दिल्ली व रुबीताज रेडीओ टिव्ही सिंगर मुंबई यांचा दुय्यम कव्वाली चा शानदार मुकाबला होणार आहे तरी समस्त जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन सय्यद आबिद अली, रऊफ खान वजीर खान, बाबाराव सिडाम, मनसुर भाई पारेख यांनी केल आहे
या ऊर्सला दरवर्षी विविध ठिकाणावरून भाविक येत असतात विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सर्व जाती धर्माची जनता एकत्र येवून आनंदाने कार्यक्रम पार पाडतात.त्यामुळे तीन दिवस कुसळ येथे मोठी रेलचेल राहते

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …