Breaking News

*रेती तस्करांकडून पत्रकारांवर जीवघेणा हल्ला,* *जातीवाचक शिवीगाळ,ट्रक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न.*

*रेती तस्करांकडून पत्रकारांवर जीवघेणा हल्ला,*

*जातीवाचक शिवीगाळ,ट्रक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न.*

*सांगोडा रेती घाटावरील घटना…*
*तहसीलदाराची घटनास्थळी येण्यास मनाई,कामात असल्याचे बहाना.*

आवारपूर प्रतिनिधि- गौतम धोटे

 

कोरपनातालुक्यातील विविध रेती घाटावरून रात्रंदिवस मोठ्याप्रमाणात रेती तस्करी होत असल्याची बोंब सुरू असून तालुका महसूल विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याच्या आरोपांना कमालीचे उधाण आले आहे.स्थानीक महसूल प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचे लक्षात घेऊन 2 मार्च रोजी काही पत्रकार कोरपना तालुक्यातील सांगोडा रेती घाटावर वृत्त संकलनासाठी गेले असता त्याठिकाणी उपस्थित रेती तस्करांकडून बेदम मारहाण करण्यात आली तसेच जातीवाचक शिवीगाळ व एका महीला पत्रकाराला ट्रक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली असून याविषयी कोरपना तहसीलदारला माहिती देऊन घटनास्थळी येण्यास सांगितले असता “मी सध्या कामात आहे” असे म्हणत येण्यास मनाई केल्याची माहिती मिळाली आहे.असे असल्यास तालुका महसूल विभाग रेती तस्करी संबंधी कीती गंभीर आहे हे स्पष्ट होते.रेती तस्करांकडून पत्रकाराला जमिनीवर पाडून मारहाण करीत असल्याचे चित्र व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत असून सदर घटनेचा निषेध व्यक्त होत असून यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध पत्रकार संघाकडून होत आहे.कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …