Breaking News

*पोलीस प्रशासनाच्या विश्वासाने ताडगुडा येथील नागरिकाचे हात सरसावले*

*पोलीस प्रशासनाच्या विश्वासाने ताडगुडा येथील नागरिकाचे हात सरसावले*

*11भरमार (बंदुकी) केले जमा*
*भीऊ नका पोलीस प्रशासन आपल्या सोबत आहे*
(शैलेश बलकवडे पो.अधीक्षक गडचिरोली)

*पेरमिली प्रतिनिधी-  श्रीकांत दुर्ग*

*पेरमिलि अति दुर्गम व नक्षरग्रस्त भाग म्हणून ओळखले जाणारे गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे*
*यातील अहेरी तालुक्यातील पेरमिली पासुन 8 कि.मि असलेल्या ताडगुडा येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने भव्य जनजागरण मेळाव्याचे घेण्यात आले होते त्या दिवशी पोलिस प्रशासनाच्या मार्गदर्शनामुळे दि.1 मार्च 2020 ला ताडगुडा येथील नागरिक भाउक होवून समाजाच्या मुख्य प्रवाहात व विकासाच्य दिशेने वाटचाल करण्यासाठी नागरिकांनी मा.पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मा .अपर अधीक्षक अजयकुमार बंन्सल,मा.डॉ मोहित गर्ग अपर पोलीस अधीक्षक, मा.मनिष कलवानिया, उपविभागीय पोलीस अधिकारी मा.बजरंग देसाई,पेरमिली येथील प्रभारी पोलीस अधिकारी मा.महेश मतकर,पोलीस निरीक्षक मा.प्रदिप गायकवाड,पोलीस निरीक्षक मा.पाटील याच्या समोर 11बरमार बंदुक पेरमिली पोलीस स्टेशनमध्ये जमा केले व आतापासुन सविधानानुसार वागणूक करू असे मनोगत व्यक्त केले*
*याप्रसंगी मा.पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी ग्राम वासीयांना संबोधित करत म्हटले की पोलीस प्रशासन व शासन आपले वैरी नसून काही लोकं आपल्या भावनांचा लाभ उचलून आपल्या नक्सलग्रस्त गतीविधी चालवून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करुण आपले स्वार्थ साधतात शासन समस्त नक्सलग्रस्तांशी संवाद साधून त्यांना समाजाच्या मुख्य धारेत आणन्याचा प्रयत्न करत असून यात मोठ्या प्रमाणात आम्हाला यश सुध्दा मीळत आहे.पोलीस प्रशासनाव्दारे असेच जनजागरण मेळावे प्रत्येक गावा गावात आयोजित करुण आम्ही संपूर्ण ताकतीनीशी आपल्या सोबत आहो यात तीळमात्र ही शंका नाही.शासनाच्या अश्या उपक्रमांनी जनता व पोलीस प्रशासनात विश्वास कायम होत असून त्यातून चांगले परिणाम नक्कीच पुढे येतील असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करुण समाज सुधारणा,कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता अनेक समाजसेवी घडपड करित आहेत पोलीस प्रशासन त्यांचे व पेरमिली येथील नागरिकांचे सदैव आभारी राहतील असे मनोगत व्यक्त करित कोणत्याही प्रकारची भीती मनात न ठेवता संविधान व कायद्याच्या चाकोरीत आपले जिवन व्यापन करा पोलीस प्रशासन सदैव आपल्या सोबत आहे असे भरीव आश्वासन याप्रसंगी उपस्थित ग्राम वासीयांनख दीले*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …