Breaking News

*अवकाळी पावसाचा तडाखा़* – *पावसा सोबतच झालेल्या गारपीटीने आंबा,संत्रा,मोसंबी,गहू, हरभरा सह फळ भाज्या पीकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता*

*सावनेरात अवकाळी पावसाचा तडाखा़*

*पावसा सोबतच झालेल्या गारपीटीने आंबा,संत्रा,मोसंबी,गहू, हरभरा सह फळ भाज्या पीकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता*

सावनेर प्रतिनिधि- सूरज सेलकर सोबत दिनेश चौरासिया

*सावनेरः सावनेर क्षेत्रात सकाळ पासूनच ढगाळ वातावरणामुळे पावसाची हजरी लागणार असे अपेक्षित असतांना दुपारी 3-30च्या दरम्यान हलक्या पावसाच्या सरी पडू लागल्या व बघता बघता मोठाल्या थेंबाच्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली व पावसा सोबतच हलक्या प्रतिची गारपीट झाली*


*शुक्रवार दिवस हा सावनेरकर व परिसरातील अनेक छोट्या गावाकरिता आठवडी बाजार असतो यामुळे बाजारात ग्रामस्थांची व दुकानदारांची एकच गर्दी असते ऐन बाजाराच्या वेळेवर अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने काही काळ बाजारातील ग्रामस्थ व दुकानदिर आपली दुकाने सोडून आडोश्याचा शोध घेऊ लागल्याने रस्त्यावर फक्त दुकानेच उरली असल्याचे व रोडने वाहणार्या पाण्याच्या प्रवाहात वांगी,टमाटर,मीर्ची,भेंडी वाहून दुकानदारांना नुकसान सहन करावे लागले*

*मागील दोन तीन दिवसा पासुन तालुक्यात सतत पडत असलेल्या आवकाळी पाऊस व गारपीटीमुळे आंबा,संत्रा,मोसंबी,फळ-भाज्या सह हाती पडणारे गहु,हरभरा कापूस सारख्या पीकांचे नुकसान झाले असुन आधीच निसर्गाच्या प्रकोपाला बळी पडलेला शेतकरी हवालदिल अवस्थेत आकाशाकडे बधुन “नको देव राया अंत आता पाहू….*
*असे बोलण्यास विवश झाला आहे…*

 

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …