Breaking News

*नवीन बिना भानेगाव येथे महिला दिवस साजरा*

*नवीन भानेगाव येथे महिला दिनानिमित्त एकदीवसीय कार्यशाळा*


*नवीन बिना भानेगाव येथे महिला दिवस साजरा*

*नागपुर उप प्रतिनिधी दिलीप येवले*

खापरखेडा:- *प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू तसेच नवीन भानेगाव येथील स्थानिक महिला यांच्या संयुक्त विद्यमानाने येथे महिला दिवसानिमित्त कार्यशाळा घेण्यात आली या कार्यक्रमाला माउंट आबू राजस्थान मध्ये गोल्डन सन्मानित आदरणीय ब्रह्मकुमारी संगीता व सपना दीदी तसेच भानेगावातील डॉ मीनाक्षी वासनिक, पिंकी चिखले, कविता चिखले, सुनिता तिक्कस, अलका लिखार कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी होत्या. ब्रह्मकुमारी संगीता दीदी यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगत असताना म्हटले की महिला दिवस महिलांसाठी एक सन्मान, प्रशंसा, प्रेम पुर्ण उत्सव आहे महिलांनी आपल्या पायावर उभे राहणे व क्षेत्रात प्रगती करणे घर परिवार सांभाळून एक उच्चस्तर घाठणे महिलांनी पुरूषावर अवलंबून न राहता स्वतः आत्मनिर्भर होऊन एक नवीन दिशा स्वतः तयार करणे या सर्व विषयावर प्रकाश टाकला महिलांनाना प्रोत्साहित केले तसेच त्यांनी सांगितले की विश्वामध्ये 1937 पासुन महिला द्वारे चालविण्यात येणारी एकमेव अध्यात्मिक संस्था प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या नावाने सुरू असून सर्व महिलांमध्ये आज आत्मविश्वास, आत्मशांती, आत्मनिर्भर इत्यादी मोफत सेवा देऊन महिलांनी निर्माण करण्याचे काम करीत आहे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी घेण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा कुंभारे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिव्या विशाल नाईक यांनी केले यावेळी कार्यक्रमाला ज्योती आचार्य, अलका निखार, संगीता नाईक, माधुरी नाईक, जुही दादे, रेखा मिश्रा, सुचीता कुंभारे, शिवांगी निलमवार, नीलमा नाईक, वैशाली भास्कर, हर्षा नागरकर, शालिनी भास्कर, रेखा साद, प्रांजली मोरे, लिला गायकवाड, दिपीका साद, तुळसा मोहाळीकर, वर्षा भास्कर मंदा भास्कर आदी महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.


कार्यक्रमादरम्यान डाँ मिनाक्षी वासनिक यांचा नागपुर यूनिवर्सिटी मधून पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल शाल-श्रीफळ देऊन अशा नाईक यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला तसेच महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन दिव्या विशाल नाईक, सुचित्रा कुंभारे, समीक्षा कुंभारे यांच्या सुद्धा सर्व महिला तर्फे सत्कार करण्यात आला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …