Breaking News

*श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव तर्फ खापरखेडा मध्ये शिवजयंती साजरी*

*श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव तर्फ खापरखेडा मध्ये शिवजयंती साजरी*

*शोभायात्रा, आकर्षक सजावट व विद्युत रोषणाईने फेडले डोळ्यांचे पारणे*


*जय भवानी जय शिवाजी च्या गजराने दुमदुमली खापरखेडा नगरी*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

खापरखेडा:- मागील 26 वर्षापासून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती उत्सव (तिथीप्रमाणे) दिनांक 12 .03.20 रोज गुरुवारला शोभायात्रा व शिवजयंतीचे आयोजन करण्यात आलेले होते. भानेगाव येथून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शोभायात्राला सुरूवात झाली. सर्वात प्रथम भानेगाव टी पाँईट येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले व शोभायात्रेला सुरूवात करण्यात आली. डीजे, बाबुलगाव बँडपथक, घोडे, रथ, विद्युत रोशनाई, फुले उडणारा रणगाडा या सर्वांचा समावेश शोभायात्रेत होता. शोभायात्रा हि भानेगाव टी पॉईंट, आजाद मैदान, गोल बाजार, राम मंदिर, पोलीस स्टेशन, रेल्वे चौकी, शिवालय अण्णा मोड असा शोभायात्रेचे भ्रमण करून शोभायात्रेचे समापन शिवालय कार्यालय खापरखेडा येथे करण्यात आले शिवालय कार्यालयात विविध मान्यवरांचे मनोगत झाले सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी राजे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला तसेच व शाळेकरी मुलांनी एकापेक्षा एक कार्यक्रम सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार कृपाल तुमाने, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावनेर पंचायत समिती सभापती अरूणा शिंदे, चिचोली ग्राम पंचायत सरपंच पुरूषोत्म चांदेकर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजक अशोक झिंगरे उपजिल्हा प्रमुख नागपूर
नरेंद्र मोरे (तालुका प्रमुख)प्रवीण बेलसरे,राज तांडेकर (जिल्हा समन्वयक ना.ग्रा )किशोर तांडेकर (चिंचोली विभाग प्रमुख) प्रशांत इखार,गोपाल श्रीवास्तव,धीरज गुप्ता, सचिन गजभिये,कृष्णा बर्वे,बल्लूभाऊ श्रीवास्तव,विकास बाराई, प्रकाश बाळापुरे,शुभम झिंगरे,शुभम तराळे,चेतन भोंडेकर, सारंग महल्ले,योगीराज जाधव,शैलेश कनोजिया,अजय गुप्ता,ललित श्रीवास्तव,अमित शेंडे,दिनेश सपाटे,आनंद श्रीवास्तव,राजू बर्वे, सुनील डिगे, राजू चांदेकर,विजय बहादूरे, अरुण लांजेवार,रोशन कोटररुंगे, अनमोल पाटील,स्वप्नील वैद्य,पवन खंगार,धीरज चिकणकर,वतन बागडे,आकाश विश्वकर्मा, अखिलेश तांडेकर,शिवसैनिक उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …